

Election officials prepare as Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti polls are announced.
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उद्या (ता. १६) खाली बसत असतानाच मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीचे रणांगण उद्यापासून (ता. १६) सुरू होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात होत आहे. अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस २१ जानेवारी आहे.