कोनवडेची कन्या घेणार हाती देशसेवेसाठी रायफल

सशस्त्र सीमा बलमध्ये निवड
आई-वडीलांसमवेत संगीता पाटील
आई-वडीलांसमवेत संगीता पाटीलSakal

कोनवडे - घरची परिस्थिती गरिबीची.. घरी कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. आई-वडील दोघेही शेतकरी, शेती तीही जेमतेम. योग्य मार्गदर्शन करण्यासाठीही कोणी मार्गदर्शक नाही. परंतु जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात सशस्त्र सीमा बल (एसएसबी) सैन्यदलात भरती होत संगीता पाटील या युवतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होता येते हे सिद्ध करून दाखवले आहे. देशसेवेची रायफल तिच्या हाती आता येणार आहे. कोनवडे (ता. भुदरगड) येथील रेखा व पांडुरंग पाटील यांच्या संगीता या मुलीची ही प्रेरणादायी यशोगाथा आजच्या युवतींसमोर आदर्शवत अशीच आहे. दहावीनंतर तिने मुदाळ येथील प. बा. पाटील विद्यालय येथून बारावीची परीक्षा पास होऊन तिने कठोर परिश्रमातून हे लख्ख यश मिळवले. अलवर (राजस्थान) येथून ट्रेनिंगहून घरी आलेल्या गावच्या कन्येचे ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. तिच्या ह्या निवडीचे कौतुक होत आहे.

एकीकडे कॉलेज करत दुसरीकडे संगीताने व्यायाम धावण्याचा सराव करून हे यश मिळवले. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) अखेर तिने यश मिळवत ट्रेनिंग पूर्ण करून गावचे नाव काढले. पोलिस अथवा सैन्यदलातील भरतीविषयी मार्गदर्शन करणारे घरी कोणीही नसताना स्वतःच्या हिमतीवर व परिश्रमावर विश्वास ठेवून संगीताने हे यश मिळवले. परिस्थितीवर मात करून तिनं मिळवलेल्या ह्या तिच्या यशाचे कौतुक होत आहे. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) बिहार (बथनाह) येथे ती ट्रेनिंग पूर्ण करून हजर होणार आहे.

आजच्या युवतींनी परिस्थितीचा विचार न करता कठोर परिश्रम करून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. कठोर परिश्रमशिवाय पर्याय नाही.

- संगीता पाटील, एसएसबी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com