
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील प्रलंबित एमआयडीसीसह इतर लघुप्रकल्पांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून सर्वसामान्यांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी करण्यासाठी सर्व कार्यालये 'महानेट'द्वारे जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
भुदरगड तालुका कॉग्रेसतर्फे झालेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील प्रमुख उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष शामराव देसाई, समन्वयक सचिन घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मंत्री पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा सत्कार झाला. इंजूबाईदेवी सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावरील भुदरगड तालुक्यातील सर्व गावात पदाधिकार्यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. जनता दरबारात अनेकांनी मंत्री पाटील यांना निवेदन देऊन विविध प्रश्नावर चर्चा केली. मंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत शासन व प्रशासनात अनेक बदलाची गरज आहे. सर्वसामान्यांची कामे तात्काळ होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तलाठी, ग्रामसेवक व शिक्षकांनी गावात राहिले व तालुक्यातील अधिकारी सर्वाधिक वेळ कार्यालयात उपस्थित राहिल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील. सचिन घोरपडे म्हणाले, पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून कॉग्रेसला चांगले नेतृत्व मिळाले आहे. ते जिल्ह्यात पक्ष वाढीसह विकासकामांचे नवे पर्व निर्माण करतील. तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी प्रास्ताविक केले.
युवक कॉग्रेसचे शंभूराजे देसाई यांनी स्वागत केले. बाबासाहेब देसाई, आर. व्ही. देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. विजयसिंह मोरे, प्रकाश देसाई, एस. एम. पाटील, विश्वनाथ कुंभार, सदाशिवराव चरापले, सुरेश नाईक, राजू काझी, अशोक जगताप, सुधीर वर्णे, लहू कुडतरकर, किरण पाटील, अमर बरकाळे,संदीप चव्हाण, संजय सरदेसाई, धनंजय पाटील, वैभव तहसिलदार, सुशील पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. सरचिटणीस भुजंगराव मगदूम यांनी आभार मानले.
घोरपडे यांना संधी द्या
भुदरगडमधून गोकुळसाठी 'टीम सतेज' मधील सचिन घोरपडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी केली.
गाव तिथे कॉग्रेस
जिल्ह्यात लवकरच गाव तिथे कॉग्रेस मोहिम राबविणार आहे. यामाध्यमातून घराघरापर्यंत कॉग्रेसचे विचार पोचविले जातील. प्रत्येक तालुक्यात सर्वसामान्यांच्या अडीअचडणी सोडविण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी कॉग्रेसचे कार्यालय स्थापन करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.