esakal | अशी वापरा लायनर लिपस्टिक
sakal

बोलून बातमी शोधा

अशी वापरा लायनर लिपस्टिक

अशी वापरा लायनर लिपस्टिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे: चांगले दिसण्यासाठी काजळपासून लायनर लिपस्टिक लावण्यापर्यंतचा योग्य पद्धत माहीत असायला हवी. मग ते भारतीय कपडे असो किंवा वेस्टर्न

१. चिकी लव

- ब्लश तुम्हाला ओव्हरऑल लूकला सुंदर बनवते. आपल्या स्किन टोननुसार पावडर ब्लश सिलेक्ट करा आणि गालावर लावा. रोझ आणि कोरल रंगाच्या ब्लश ऑलमोस्ट प्रत्येक स्किन टोनवर सूट करते.

२. लिक्विड नको

- सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात, की ऋतूनुसार फाऊंडेशन वापरायला हवे. जसे की उन्हाळ्यात तुम्ही लिक्विड फाऊंडेशन वापरल्यास ते विरघळू शकते. कारण जर फाऊंडेशन वापरायचे असेल तर चांगल्या ब्रँडचे पावडर बेस्ड फाऊंडेशन वापरा. थंडीत लिक्विड फाऊंडेशन वापरु शकता.

३. आय मॅजिक

साधे काजळ वंडर लूक तयार करु शकते. मात्र काजळ लावताना प्रयत्न करा की ते वाॅटर प्रूफ असेल. या फार वेळ जात नाही. याने डोळ्यांना स्मोकी लूकही मिळतो.

४. टिंटेड ग्लो

सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात, की कमीत-कमी मेकअप हेच या ऋतूत चांगला सौंदर्य मंत्र असायला हवे. हलकेसे शीन ग्लो कोणत्याही प्रसंगी सुटेबल होऊ शकते. यासाठी बीबी क्रिम किंवा टिंटेड माॅश्चरायझरचा वापर सर्वांत चांगले राहील.

५. बोलके ओठ

डार्क लिपस्टिक्सऐवजी लाईट कलरच्या लिप ग्लाॅसेज किंवा लिप बाॅम्सचा वापर करा. ओठांवर केवळ कलर टिंटच ठेवा. बबल गम पिंक, सनसेट बेझ, न्यूड रोझसारखे ट्रान्सपरन्ट ग्लाॅसच वापर करा. कारण प्रत्येक ऋतूत हे आयडल असते. लिप लायनरचा जरुर वापर करा. कारण याने लिपस्टिक खूप वेळ टिकून राहते आणि लिप लायनर लावल्यानंतरच लिपस्टिक लावा.

loading image