esakal | दानोळीतील दारू भट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

jaysingpur

दानोळीतील दारू भट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : दानोळी (ता.शिरोळ) येथे बेकायदेशीर तीन ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्या जयसिंगपूर व गुन्हेशोध अन्वेषणच्या पथकाने उद्वस्त केल्या. गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. यात ८८ हजार ६९० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी संशयीत आरोपी शिवाजी माने व अर्जुन चव्हाण (रा. दानोळी) हे दोघे घटनास्थळावरून फरारी झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गुन्हेशोध अन्वेशनचे फिरोज बेग व पो.कॉ.अमोल अवघडे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली. दानोळी येथील हाफिज तांबोळी यांच्या शेताजवळ धरणाकडे जाणार्‍या रोडवर कुरण ओढ्यावर बेकायदेशीर हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती.

यानुसार इचलकरंजी गुन्हेशोध अन्वेशन व जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हेशोध पथकाने सापळा रचून तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन, कच्चे रसायन, जळके रसायन, तयार दारू जागेवर नष्ट करण्यात आले. तसेच पत्राचे बॅरेल, अ‍ॅल्युमिनियमचे डबे, प्लॉस्टिकची पोती यासह तयार करण्यासाठी लागणारे साहित्य उद्वस्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पो.ना.गुलाब सनदी, रोहित डावाळे, संजय शेटे यांच्यासह पथकाने केली.

loading image
go to top