'पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे, तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये'; संभाजीराजेंच्या टीकेला महाडिकांचे प्रत्युत्तर

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची लोकसभा निवडणुकीतून माघार आश्चर्यकारक आहे.
Kolhapur Loksabha Election
Kolhapur Loksabha Electionesakal
Summary

महायुतीमधून काही नेते शाहू महाराज छत्रपती यांच्या वयासंदर्भात टिप्‍पणी करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाचा दाखला दिला.

कोल्हापूर : ‘पंतप्रधान मोदींचे वय काय आणि त्यांचे कार्य काय? हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते अविश्रांतपणे एकही दिवस सुटी न घेता काम करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये’, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.

Kolhapur Loksabha Election
शरद पवारांच्या मित्राच्या उमेदवारीलाच पक्षातून तीव्र विरोध; साताऱ्याच्या उमेदवारीवर पवारांची 'वेट ॲण्ड वॉच' भूमिका

देशातील भाजपच्या (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्याने त्याबाबत महाविकास आघाडीकडून टीका सुरू आहे.

Kolhapur Loksabha Election
Loksabha Election : सांगलीच्या काँग्रेसवर ही वेळ का आलीये? जयंतरावांनी नेहमीच काँग्रेस खिळखिळी करण्याचा केला प्रयत्न!

महाराष्ट्रातील महायुतीची (Mahayuti) यादी कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पाश्‍‍वभूमीवर महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली. महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या तरी दोन्हीही जागा शिंदे गटाकडे आहेत. उमेदवार बदलाच्या चर्चा असल्यातरी त्याबाबतीत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही. १० किंवा ११ मार्चला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे राज्यातील उमेदवार जाहीर होतील. त्यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने प्रयत्न करतील.’

‘माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची लोकसभा निवडणुकीतून माघार आश्चर्यकारक आहे. गेली अनेक वर्षे ते स्वराज्य पक्षाकडून निवडणुकीची तयारी करत होते. ते लोकसभा निवडणूक लढवणार हे ते स्वतः व त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक असू शकेल’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Kolhapur Loksabha Election
'शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील, तर ही निवडणूक बिनविरोध करा'; सतेज पाटलांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर

महायुतीमधून काही नेते शाहू महाराज छत्रपती यांच्या वयासंदर्भात टिप्‍पणी करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाचा दाखला दिला. त्यावर बोलताना महाडिक म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींचे वय काय आणि त्यांचे कार्य काय? हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com