Kolhapur Madrasa : 'लक्षतीर्थ'मधील विवादित मदरसा इमारत मुस्लिम समाज उतरवून घेणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लक्षतीर्थ वसाहत येथील विवादित मदरसा इमारत उतरवण्यासाठी महापालिका प्रशासन (Kolhapur Municipality) गेले असता तेथील मुस्लिम बांधवांनी विरोध केला.
Madrasa Building Controversy in Lakshatirth Colony
Madrasa Building Controversy in Lakshatirth Colonyesakal
Summary

गुरुवारी कारवाईमध्ये प्रशासनाकडून चालढकल झाल्यास कोल्हापूर बंदची हाक देणार असल्याचा इशारा दीपक देसाई यांनी दिला आहे.

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतीत विवादित मदरसा (Madrasa) इमारत ज्या जमिनीवर आहे ती जमीन शासनाची असून, त्याची विक्री होत नाही. त्यामुळे या जमिनीवरील मदरसा इमारत बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे इमारतीवर कारवाई केली जाणार आहे; मात्र मुस्लिम समाजाने वस्तूस्थिती मान्य करून ही इमारत उतरवून घेण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यानुसार गुरुवारी (ता. १) सकाळी आठ वाजता इमारत उतरवण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही जमीन नियमानुकूल करण्यासाठी प्रशासन मदत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Madrasa Building Controversy in Lakshatirth Colony
मदरशाचे बांधकाम हटवण्यास तीव्र विरोध, कोल्हापुरात तणाव; डॉ. आंबेडकरांचा फोटो हातात घेत JCB समोर महिलांचा 5 तास ठिय्या

लक्षतीर्थ वसाहत येथील विवादित मदरसा इमारत उतरवण्यासाठी महापालिका प्रशासन (Kolhapur Municipality) गेले असता तेथील मुस्लिम बांधवांनी विरोध केला. त्यानंतर महापालिका प्रशासन, पोलिस आणि मुस्लिम बांधव यांच्यात वाद झाला. दरम्यान, हिंदुत्ववादी कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. यामध्ये भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक कुंदन पाटील यांचा समावेश होता.

न्यायालयाचा निर्णय असूनही प्रशासन कारवाई का करत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. कारवाई होईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला आहे. यामध्ये गणी आजरेकर, कादर मलबारी, जाफर बाबा, माजी नगरसेवक रियाज सुभेदार, तैफिक मुलाणी यांच्यासह अन्य प्रतिनिधींचा समावेश होता. या बैठकीला पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मीदेखील उपस्थित होते.

Madrasa Building Controversy in Lakshatirth Colony
Kolhapur Collector : वादग्रस्त राहुल रेखावार यांची पुण्याला बदली; अमोल येडगे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचा निर्णय, प्रशासनाची भूमिका शिष्टमंडळाला समजावून सांगितली. दोन्ही बैठकांमधील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात रेखावार म्हणाले, ‘‘ही जमीन वर्ग दोनची आहे. त्यामुळे ही जमीन कोणाला विकता येत नाही. या जमिनीचे खरेदीखत बेकायदेशीर आहे. मुळात जमीनच बेकायदेशीर असल्याचे त्यावरील इमारतसुद्धा बेकायदेशीर आहे. न्यायालयाच्या निर्णयात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ही इमारत उतरवली जाणार आहे.’’

दरम्यान, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने ही वस्तुस्थिती मान्य केली. तसेच गुरुवारी (ता.१) सकाळी आठला स्वतःहून इमारत उतरून घेतो, असे आश्वासन दिले आहे. या कामात त्यांना महापालिका प्रशासनही मदत करणार आहे. तसेच ही जमीन नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव त्यांनी प्रशासनाला द्यावा. या पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन त्यांना मदत करेल,’ असे रेखावार म्हणाले.

Madrasa Building Controversy in Lakshatirth Colony
'हिंदू राष्ट्र स्थापनेची वेळ जवळ आलीये, तरुणांनी जोश-होश कायम ठेवून सज्ज राहा'; भाजप आमदाराचं मोठं विधान

...तर,‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्याचा इशारा

‘या अनधिकृत बांधकामावरील कारवाईमध्ये दिरंगाई केली जात असल्याने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उठणार नाही. गुरुवारी कारवाईमध्ये प्रशासनाकडून चालढकल झाल्यास कोल्हापूर बंदची हाक देणार असल्याचा इशारा दीपक देसाई यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com