esakal | 'महाविकास आघाडी'समोर स्वतंत्र लढणे हाच एक पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

election

एकाच पक्षाच्या तिघांना मतदान करण्याऐवजी अन्य पक्षातील एखाद्या उमेदवारालाही ते मतदान करू शकतील.

'महाविकास आघाडी'समोर स्वतंत्र लढणे हाच एक पर्याय

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडीसमोर स्वतंत्र लढणे हाच पर्याय असणार आहे. तसे झाल्यास प्रत्येक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच शिवसेनेचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात असतील. विरोधात भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे तीन उमेदवार असतील.

बहुसदस्य रचनेत तीन प्रभाग एकत्रित येणार आहेत. तिन्ही पक्षांकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी असेल. त्यामुळे एकाला तिकीट दिल्यास दुसरा नाराज होण्याची शक्यता आहे. अशी नाराजांची संख्या वाढल्यास विरोधी पक्षाला त्याचे बळ मिळू शकते. तिन्ही पक्षांचे नऊ उमेदवार गृहीत घरल्यास त्यातून तीन जणांना निवडून द्यावे लागेल. मतदारांनाही कधी नव्हे इतका चॉईस राहणार आहे.

हेही वाचा: Bharat Bandh Live - सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा मृत्यू

एकाच पक्षाच्या तिघांना मतदान करण्याऐवजी अन्य पक्षातील एखाद्या उमेदवारालाही ते मतदान करू शकतील. पूर्वी अमूक एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज व्हायचा. ती परिस्थिती आता असणार नाही. पक्षांना तीन कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची संधी आहे. तीन उमेदवारांत ओबीसीची एक जागा राखीव असेल. अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक आहे, तेथे या गटासाठी जागा राखीव असेल.

गेल्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. नंतर एकत्र आले. त्या वेळी राज्यात शिवसेना दोन्ही काँग्रेसबरोबर नव्हती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महापालिका निवडणुकीत हा फॉर्म्युला कायम राहणार आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जातील. निवडणुकीनंतर ते एकत्रित येतील.

भाजप-ताराराणी आघाडीला एका भागात तीन उमेदवार देता येतील. गेल्या वेळी ३३ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी राज्यात युती सत्तेत होती. आता नेमकी उलटी स्थिती आहे. या निवडणुकीत आघाडीचा प्रमुख विरोधक हा काँग्रेस राहील. राष्ट्रवादीशीही टोकाचे मतभेद असल्याने हाही पक्ष विरोधक असेल. भाजप- शिवसेनेशी संबंध ताणल्यामुळे तिन्ही पक्ष एका बाजूला आणि भाजप-ताराराणी आघाडी विरोधात असे चित्र नजरेस पडेल.

हेही वाचा: CSK चा धडाकेबाज खेळाडू कसोटी सामन्यातून निवृत्त

तीन प्रभागातील संपर्क ठरणार महत्त्वाचा

एक सदस्यीय प्रभाग रचनेत पूर्वी कमालीची चुरस होती. एकाच मताचा अधिकार असल्याने एकाला मतदान केले की दुसरा नाराज व्हायचा. बहुसदस्यीय रचनेमुळे एखादी तालीम, गल्ली, विशिष्ट कॉलनी, गट्ठा मतदान हा विषय संपला आहे. तीन प्रभागांत संपर्क असलेला उमेदवार प्रभावी ठरेल. नव्या रचनेमुळे राजकीय पक्षांचे काम सोपे झाले आहे.

loading image
go to top