Baliraja Shetpanand Road Scheme : पाणंद रस्ता अडविल्यास आधार, फार्मर आयडी पाच वर्षे ब्लॉक! अतिक्रमणधारकांना शासकीय योजनांचा लाभही बंद; पाणंद रस्त्यांसाठी कठोर नियमावली

Maharashtra Baliraja Shetpanand Road Scheme new rules : मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची नवी नियमावली जाहीर झाली आहे. अतिक्रमणधारकांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी पाच वर्षे ब्लॉक होणार असून, शासकीय योजनांचे लाभही बंद राहणार आहेत.
Farmer ID suspension for five years Maharashtra

Farmer ID suspension for five years Maharashtra

esakal

Updated on: 

कुडित्रे : शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी आणि शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली असून, रस्ता अडविणाऱ्या अतिक्रमणधारकांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्याची तरतूद केली (Aadhaar card block for farm road encroachment) आहे. संबंधितांना पाच वर्षे शासकीय अनुदान किंवा कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही.

Loading content, please wait...