Koyna hydropower project latest update
esakal
चिपळूण : राज्यातील वाढती विजेची मागणी, औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळशाची कमतरता आणि उरण वायू विद्युत केंद्राला होणारा अपुरा गॅसपुरवठा यामुळे वीजनिर्मिती व्यवस्थेवर ताण वाढत (Maharashtra electricity demand 2026) आहे. अशा परिस्थितीत पाण्यावर अवलंबून असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे; मात्र, पावसाने ओढ दिल्याने कोयना धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्याची गरज यांचा समतोल साधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचा वापर, विशेषतः उन्हाळ्यापर्यंतचे नियोजन, राज्याच्या ऊर्जा व्यवस्थेच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.