कुडित्रे : शेत जमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. हे वाद संपुष्टात येण्यासाठी शासनाने ‘सलोखा योजना’ (Salokha Yojana Maharashtra) आणली आहे. योजनेमध्ये नाममात्र फी भरून जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांचे शेतीचे वाद संपुष्टात आले असून सुमारे पावणेचार लाखांची बचत झाली आहे. यामुळे शेतकरी कुटुंबातून समाधान व्यक्त होत आहे.