धैर्यशील मानेंचा पत्ता कट? हातकणंगलेतून कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

भाजपने लोकसभेच्या राज्यातील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
mahayuti MLA Vinay Kore
mahayuti MLA Vinay Koreesakal
Summary

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विक्रमी मतदान घेतल्याने खासदार माने यांचा विजय सुकर झाला.

कोल्‍हापूर : लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील (Hatkanangle Constituency) विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) विरुद्ध आमदार प्रकाश आवाडे यांच्यात रंगलेला कलगीतुरा, तसेच श्री. माने यांचा मतदारसंघात संपर्क नसल्याचा होत असलेला आरोप आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरून या मतदारसंघातून महायुतीतर्फे ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

विद्यानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व डॉ. कोरे यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. आताच त्याचा गवगवा न करता अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात कोरे यांची उमेदवारी जाहीर करण्याची रणनीती आहे.

mahayuti MLA Vinay Kore
Loksabha Election : 'पत्ते पिसलेले आहेत, त्यातील हुकमी एक्का आमच्याकडे आहे'; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

भाजपने लोकसभेच्या राज्यातील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपच्या मित्र पक्षांतील दिग्गजांना रिंगणात उतरण्यात येणार आहे. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुंताश सर्वच मतदारसंघात महायुतीसमोर आणि पर्यायाने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशात ज्या खासदारांविरोधात नाराजी आहे, त्यांनाच उमेदवारी देण्याचा धोका टाळण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी सुरुवातीला ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनाच गळ घालण्याचा प्रयत्न झाला; पण श्री. शेट्टी स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत, हे लक्षात आल्यानंतर भाजपने पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.

लोकसभेसाठी चाचपणी करताना उमेदवार सर्वमान्य असावा, त्यांचा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मतदारसंघात संपर्क असावा, जातीची गणिते या सर्वांचा अभ्यास केला जात आहे. त्यातूनच डॉ. कोरे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी वाळवा व हातकणंगले मतदारसंघ सोडला तर अन्य चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. हे राजकारणही डॉ. कोरे यांना रिंगणात उतरण्यामागे आहे.

mahayuti MLA Vinay Kore
महायुती की महाविकास आघाडी? राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले, शिवरायांनी शिकवलेल्या गनिमीकाव्याने..

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विक्रमी मतदान घेतल्याने खासदार माने यांचा विजय सुकर झाला. याबरोबरच जातीचे राजकारणही श्री. माने यांच्या विजयात महत्त्वा‍चे ठरले आहे; पण आता ‘खासदारांनी काय काम केले’ अशी थेट विचारणा करून आमदार प्रकाश आवाडे यांनी श्री. माने यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला आहे. श्री. शेट्टी रिंगणात उतरले आणि महाविकास आघाडीने त्यांना न मागता पाठिंबा दिला तर इथली महायुतीची जागा अडचणीत येऊ शकते, याचाही विचार डॉ. कोरे यांना उमेदवारी देण्यामागे असल्याचे बोलले जाते.

mahayuti MLA Vinay Kore
शिवसेनेची 'ती' जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडली जाणार नाही; रामदास कदमांनी कोणत्या जागेवर केलाय दावा?

डॉ. कोरे यांच्या जमेच्या बाजू

  • शिरोळ, इचलकरंजी, शिराळ्यात महायुतीचे व स्वतः शाहूवाडीचे आमदार असल्याने ताकद आहे

  • हातकणंगले व वाळवा, शिराळा मतदारसंघात महाडिक गटाची लक्षणीय ताकद पाठीशी

  • ‘राजाराम’च्या निवडणुकीतील परतफेड महाडिक यांच्याकडून होण्याची शक्यता

  • वारणा कारखाना व दूध संघाचे सांगली जिल्ह्यात त्यातही शिराळा व वाळवा तालुक्यातील कार्यक्षेत्र

  • तीन तालुक्यांतील जातीची समीकरणे

  • शेट्टी स्वतंत्र असले तर डॉ. कोरे यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या मतांची होणारी संभाव्य विभागणी

  • सहकारासह शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून केलेले काम, त्यातून संपर्क

  • लोकसभेला निकाल वेगळा लागला तरी विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून भाजपचा पाठिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com