Lok Sabha Election 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेना; नवा उमेदवार द्यायचा, तर त्याचीही वानवा

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, तरी महायुतीतील जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा घोळ मात्र संपता संपेना. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या महायुतीच्या २८ जागांचा अजून निर्णयच न झाल्याने या जागांवरील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेना
महायुतीचा जागा वाटपाचा घोळ संपेनाSakal
Updated on

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली, तरी महायुतीतील जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा घोळ मात्र संपता संपेना. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या महायुतीच्या २८ जागांचा अजून निर्णयच न झाल्याने या जागांवरील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने थेट उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नसली, तरी कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसचे उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. दुसरीकडे महिनाभर अगोदर उमेदवारांची घोषणा करण्याची परंपरा असलेल्या भाजप आणि महायुतीचे मात्र घोडे अडले आहे.

उमेदवार बदलायचा तर दुसऱ्या ताकदीच्या उमेदवारांची वानवा आहे. अशा परिस्थितीत निर्णय जेवढा लांबत जाईल तेवढी उमेदवार, नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही घालमेल वाढणार आहे.

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा निर्णय होईल, अशी अपेक्षा असताना ती लांबली आहे.

जिल्ह्यातील दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जातील, असे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप व शिंदे गटाचे प्रमुख नेतेही सांगत असताना निर्णय मात्र अद्याप होत नाही.

एकीकडे निर्णय लांबत असताना इच्छुकांनी मात्र आपल्या संभाव्य उमेदवारांविरोधात टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. ही टीका करत असताना थेट उमेदवारांवर न करता या घडामोडीत आघाडीवर असलेल्या नेत्यांवर करून आपल्या परिपक्वतेचे दर्शन दिले जात आहे.

कोल्हापुरातून महायुतीकडून आपली उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक करत असले तरी, पक्षाच्या पातळीवर त्यांच्याबाबतीत कोणताही ‘सिग्नल’ मिळत नाही. अशीच स्थिती हातकणंगले मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांची आहे. खासदार धैर्यशील माने यांनी मात्र थेट त्यांचे संभाव्य विरोधक असलेल्या ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांना ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केली आहे.

संभ्रमाचे वातावरण

महायुतीचा उर्वरित २८ जागांचा निर्णय का लांबत आहे, असा प्रश्‍न महायुतीमधील कार्यकर्त्यांनाही पडलेला आहे. स्थानिक पातळीवर चौकशी केली, तर दिल्लीतूनच निर्णय होईल, असे सांगितले जाते, तर दिल्लीतून जिल्ह्यातील दोन्ही जागांसह शिंदे गट व अजित पवार गटाला किती जागा मिळणार, याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC
EAC-PM parliamentary seat expansion report
Rajya Sabha Elections 2026
Solapur IT Park Project
Marathi News Esakal
www.esakal.com