

कोल्हापूर: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे.