Hasan Mushrif : सुळकूड योजनेतून इचलकरंजीला पाणी दिल्यास रक्तपात होईल; मुश्रीफांचा कडक शब्दात इशारा, काय आहे वाद?

'सुळकूडमधून एक थेंबही पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही.'
Minister Hasan Mushrif
Minister Hasan Mushrifesakal
Summary

'इचलकरंजीला मजरेवाडीतून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणे झाल्यावर आपली भूमिका ठरवू आणि गरज पडल्यास मोर्चा काढू.'

कोल्हापूर : इचलकरंजीला (Ichalkaranji) शुद्ध पाणी मिळावे, यासाठी मजरेवाडीची योजना (Majrewadi Scheme) मंजूर असून, कामही सुरू झाले आहे. असे असताना सुळकूड येथून पाणी घेण्याचा अट्टाहास का? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतची माहिती देणार आहोत. इचलकरंजीला सुळकूडमधून नाही, तर मजरेवाडी योजनेतूनच पाणी द्या; अन्यथा रक्तपात होईल, अशी ठाम भूमिका राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडली.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या दूधगंगा बचाव कृती समितीच्या (Dudhganga Action Committee) बैठकीत ते बोलत होते. इचलकरंजीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी सुळकूड येथील दूधगंगा नदीतून पाणी नेण्याची योजना आखण्याची मागणी करण्यात आली आहे. याला राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर, शिरोळ आणि निपाणी या तालुक्यांनी विरोध दर्शवला आहे. काल यासंदर्भातील दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक झाली.

Minister Hasan Mushrif
Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणक्षेत्रात 'इतक्या' मिलिमीटर पावसाची गरज; पाणीसाठा कमी होणं ठरणार चिंताजनक

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘दूधगंगा नदीवर काळम्मावाडी धरण बांधतानाचा इतिहास सर्वांनी पाहिला पाहिजे. त्याकाळी रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संघर्ष केला, मग हे धरण झाले. आमच्या जमिनी त्यामध्ये गेल्या आहेत. तुम्ही नदी घाण करायची आणि मग स्वच्छ करायला पाणी सोडायचे, हे आता चालणार नाही. ५ हजार कोटींचे क्लस्टर घेता, मग सांडपाणी शुद्ध करण्याचे प्रकल्प का बसवत नाही?’

Dudhganga Action Committee
Dudhganga Action Committeeesakal

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘इचलकरंजीमध्ये पाणी प्रदूषण अधिक आहे. पाण्याच्या मुद्द्यावर महार्गाच्या या बाजूचे आणि त्या बाजूचे अशी फाळणी नको; पण नदी स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. दूधगंगेतून पाणी नागरिकांना नको आहे, हे सगळे नेत्यांचे नाटक आहे. इचलकरंजीचे औद्योगिक सांडपाणी नदीत सोडल्याने मासे मरतात. शिरोळ तालुक्याला दूषित पाणी प्यावे लागते. आधी पंचगंगा शुद्ध करा, मगच इचलकरंजीकरांनी पाणी मागावे.’

Minister Hasan Mushrif
दोन्ही राजेंमधला वाद मिटला? उदयनराजे-रामराजे एकमेकांच्या शेजारी बसले अन् हास्यविनोदातही रमले, अनेकांच्या उंचावल्या भुवया

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ‘वारणा, कृष्णा आणि पंचगंगा या तिन्ही नद्यांच्या पाणी योजना इचलकरंजीसाठी केल्या होत्या, पण त्यांनी पाणी शुद्ध ठेवले नाही. वारणेच्या पाण्यात त्यांनी वाटा मागणे चुकीचे आहे. मजरेवाडीतून नवीन योजना मंजूर केली आहे, त्याचेच पाणी त्यांनी घ्यावे. यावर कोणतीही चर्चा करण्याचे कारण नाही.’

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘सुळकूडमधून एक थेंबही पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही. सहा तालुक्यांनी विराट मोर्चा काढून आपली ताकद दाखवून द्यावी. पाणी नाही आणि त्यावर चर्चाही नाही.’ खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून सुळकूडमधून पाणी योजनेचा प्रस्ताव मागे घ्यायला लावू. इचलकरंजीला मजरेवाडीतून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही आपलीच आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर बोलणे झाल्यावर आपली भूमिका ठरवू आणि गरज पडल्यास मोर्चा काढू.’

Minister Hasan Mushrif
Ramdas Athawale : नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वात देशाची दमदार प्रगती, चांद्रयानामुळं भारताची..; काय म्हणाले आठवले?

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, अंबरीष घाटगे, युवराज पाटील, गणपतराव पाटील, दिनकर जाधव, उत्तम पाटील, भूषण पाटील, विरेंद्र मंडलिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

के. पी. पाटील यांच्या शुभेच्छा..

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, सुळकूड पाणी योजनेला विरोध करण्याच्या निमित्ताने सहा तालुक्यांतील नेते एकत्र आले, ही चांगली बाब आहे. उल्‍हास पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपत पाटील सर्वांनाच विधानसभेला शुभेच्छा आहेत. यावर मुश्रीफांनी त्यांना ‘राजकारण नको’ असे म्हटले; त्यावर समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पाहात ‘के. पी.’ म्हणाले, ‘तुमच्या भांडणावर मी काय बोलत नाही.’

Minister Hasan Mushrif
Udayanraje Bhosale : सगळं आताच उघड केलं तर कसं होणार? लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

‘बिद्री’ला कागलची मदत लागते : समरजित

केपींना उत्तर देताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत कागलची मदत लागते. त्यामुळेच ‘के.पी.’ आमच्यावर बोलले नाहीत; पण मुश्रीफांसमोर माझा उल्लेख भावी आमदार म्हणून केला नाही त्याबद्दल धन्यवाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com