Mission Oxygen: तिसऱ्या लाटेच्या फाईटसाठी १४ ऑक्‍सिजन प्रकल्प

Mission Oxygen: तिसऱ्या लाटेच्या फाईटसाठी  १४ ऑक्‍सिजन प्रकल्प

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे (Covid Third Wave)संकट आल्यास ते परतविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून ‘मिशन ऑक्सिजन’(Mission Oxygen) उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात १४ ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारले जातील. या सर्व प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या जूनपर्यंत ते पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांनी आज येथे दिली.

mission 14 Oxygen projects in kolhapur covid 19 update

ते म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजन मंडळातून सीपीआर, आयसोलेशन, आयजीएम-इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय- कोडोली, ग्रामीण रुग्णालय- गारगोटी, मलकापूर, राधानगरी येथे प्राणवायू निर्मिती प्रकल्प; तर उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे प्राणवायू बूस्टर प्रकल्प उभारले जातील. उपजिल्हा रुग्णालय- गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय- शिरोळ, चंदगड, आजरा, कागल आणि गगनबावडा येथील पी.एस.ए. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. जिल्ह्याची ५०.९३ टन प्राणवायूची एकूण मागणी आहे. सद्यस्थितीत ३५ टन प्राणवायूचा पुरवठा होत आहे.’’

कोल्हापूरचे अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची वाढ लक्षात घेऊन ६३.६६ टन इतक्या प्राणवायूची भविष्यात गरज लागेल. प्रस्तावित व ऑक्सिजन प्रकल्पात २३ टन प्राप्त होणार आहे.प्रस्तावित प्रकल्पातून अंदाजे प्रतिदिन १८०० इतके सिलिंडर भरण्याची क्षमता असेल. यातून एक हजार २०० रुग्णांच्या प्राणवायूची गरज भागेल. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी सहा कोटी ७६ लाख ३७ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनामार्फत सहा ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पाच कोटी ६० लाख इतका खर्च अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीमधून प्रस्तावित

१) सीपीआर रुग्णालय- ८७.५ NM3/Hr इतक्या क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प, प्रतिदिन ३००

सिलिंडर निर्मिती क्षमता

एक कोटी ९६ लाख २४ हजार रुपये खर्च

२) आयसोलेशन रुग्णालय- १०.८० क्युबिक मीटर क्षमतेचा प्रकल्प, प्रतिदिन १५०

सिलिंडर निर्मिती

यासाठी एकूण खर्च ८० लाख ७५ हजार रुपये. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण, कामही सुरू

३) इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी- ५८.३३ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प, प्रतिदिन २०० सिलिंडर क्षमता

एकूण एक कोटी ३० लाख ८३ हजार खर्च

४) उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज- ४३.७३ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प कार्यरत. प्रतिदिन १५० सिलिंडर निर्मिती

ऑक्सिजन बूस्टर रिफीलिंग प्रकल्प उभारण्यात येत असून, प्रतिदिन ४० सिलिंडर भरण्याची क्षमता. यासाठी एकूण २३ लाख ८३ हजार रुपये खर्च

५) उपजिल्हा रुग्णालय, कोडोली- २९.१७ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प, प्रतिदिन १०० सिलिंडर निर्मिती

ऑक्सिजन बूस्टर रिफीलिंग प्रकल्प उभारण्यात येत असून, प्रतिदिन ४० सिलिंडर भरण्याची क्षमता. यासाठी ९३ लाख ३२ हजार इतका खर्च

६) ग्रामीण रुग्णालय, गारगोटी- २९.१७ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित. प्रतिदिन १०० सिलिंडरची क्षमता

ऑक्सिजन बूस्टर रिफीलिंग प्रकल्‍प उभारणार, प्रतिदिन ४० सिलिंडर भरण्याची क्षमता. ९३ लाख ३२ हजार लाख खर्च

७) ग्रामीण रुग्णालय, मलकापूर- २९.१७ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प, प्रतिदिन १०० सिलिंडर क्षमता

एकूण ६९ लाख ३४ हजार रुपये खर्च येणार

८) ग्रामीण रुग्णालय, राधानगरी- २९.१७ NM3/Hr क्षमतेचा प्रकल्प, प्रतिदिन १०० सिलिंडर क्षमता

एकूण ६९ लाख ३४ हजार इतका खर्च

mission 14 Oxygen projects in kolhapur covid 19 update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com