KDCC Election 2021 : महाआघाडीला तिसरी जागा; आमदार राजेश पाटीलही बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

बॅंकेत महाआघाडीला तिसरी जागा; आमदार राजेश पाटीलही बिनविरोध

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील, (Satej patil) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्या पाठोपाठ आज चंदगडचे आमदार राजेश पाटील ( MLA Rajesh patil) यांचीही जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली. राजेश पाटील यांनी चंदगड तालुका विकास संस्था गटातून अर्ज दाखल केला होता. (kdcc election 2021) या गटातून त्यांच्यासह मोहन संतू परब असे दोघांचेचे अर्ज होते. आज दुपारी परब यांनी माघार घेतल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यात आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री भरमू पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक (Mahadevrao mahadik) यांनी शिष्टाई केली.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा बॅंक : विलास गाताडे यांची अखेर माघार

आमदार पाटील यांचे वडील व माजी आमदार कै. नगरसिंगराव पाटील हे या गटातून बँकेत संचालक होते. कै. पाटील यांच्या अकाली निधनाने रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर आमदार पाटील यांना स्विकृत्त संचालक म्हणून घेण्यात आले होते. यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यासह परशुराम पाटील, मोहन परब यांचे अर्ज छाननीनंतर शिल्लक राहीले होते. काही दिवसांपुर्वी श्री. पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या गटातून आमदार पाटील व परब असे दोघांचे अर्ज शिल्लक राहीले होते.

आज सकाळपासून परब यांच्या माघारीसाठीच्या घडामोडी सुरू झाल्या. आमदार पाटील यांनी माजी मंत्री भरमू पाटील यांची भेट घेऊन परब यांच्या माघारीसाठी विनंती केली. त्यानंतर महाडीक, पी. एन. यांनी माजी मंत्री पाटील यांना संपर्क साधल्यानंतर परब यांनी दुपारी आपला अर्ज मागे घेतल्याने बँकेवर चंदगड तालुका विकास संस्था गटातून आमदार पाटील यांची निवड बिनविरोध झाली.

'गोकुळ'मध्ये पत्नीचा पराभव

आमदार पाटील हे दिवंगत खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे जावई तर खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे मेव्हणे आहेत. 'मे' महिन्यात झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. सुस्मिती यांच्यासह प्रा. मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र यांचा पराभव झाला होता. आता बँकेतील बिनविरोध निवडीने आमदार पाटील गटाला पुन्हा बळ मिळाले आहे.

हेही वाचा: 'राष्ट्रवादीच्या घशात गेलेला मतदारसंघ काबीज केलाय; ...तर शिक्षेला तयार'

टॅग्स :Kolhapur