कुंभोज : बाबूजमाल दर्गा (Babujamal Dargah) व दर्गा परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मत आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी व्यक्त केले. येथील हजरत बाबूजमालसाहेब कलंदर (पहाडी) शरीफ दर्ग्याच्या कलशारोहणप्रसंगी ते बोलत होते. बाहुबली एण्डोमेंन्ट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते.