Mpsc Results Kolhapur : राज्यसेवेत ‘कोल्हापूर’चे धवल यश पदनिहाय निवड यादी जाहीर; ग्रामीण भागातील मुला-मुलींची बाजी

‘एमपीएससी’ने मुलाखती घेवून या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी फेब्रुवारीच्या अखेरीस जाहीर केली होती.
MPSC Result
MPSC Resultesakal

Mpsc Results Kolhapur - राज्यसेवेतील विविध पदांसाठी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची पदनिहाय तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) बुधवारी जाहीर केली. त्यात कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळविले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुला-मुलींनी बाजी मारली असून त्यात ऐश्‍वर्या नाईक-डुबल, विश्‍वजित गाताडे, अपर्णा यादव यांच्यासह सातजणांचा समावेश आहे.

‘एमपीएससी’ने मुलाखती घेवून या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी फेब्रुवारीच्या अखेरीस जाहीर केली होती. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे रँकिंग (निवड यादीतील क्रमांक) समजले होते. त्यानंतर पदनिहाय तात्पुरती निवड यादी आज जाहीर केली. त्यात हळदी (ता. करवीर, सध्या रा. कराड) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल यांची नगरपालिका मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. त्या सांगली येथे एक्साईज सब इन्स्पेक्टरपदी कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वी राज्यसेवा २०२० मधून उप अधीक्षक भूमी अभिलेखपदी निवड झाली होती.

MPSC Result
Pune : पन्नाशीत गाजवली दक्षिण कोरिया ! कात्रजच्या अजय रावळ यांची बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार कामगिरी

शारिरिक शिक्षण संचालक जयसिंग नाईक यांच्या त्या कन्या, तर डीवायएसपी उदयराव डुबल यांच्या सून आहेत. त्यांचे पती संग्राम हे मंत्रालयात कक्ष अधिकारीपदी कार्यरत आहेत. म्हाळुंगे (ता. करवीर) येथील विश्वजित जालंधर गाताडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असून त्यांची राज्यसेवा २०२० मधून सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली होती.

MPSC Result
Pune Municipal Corporation : योगिता भोसलेंकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार

सामान्य कुटुंबातील विश्‍वजित यांनी खासगी शिकवणीविना सलग दुसऱ्यांदा राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांचे वडील आरोग्यसेवक आहेत. निगवे दुमाला (ता. करवीर) येथील अपर्णा जयसिंग यादव यांची जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था गट(अ) या पदी निवड झाली आहे. त्यांची यापूर्वी नायब तहसिलदारपदी निवड झाली होती.

MPSC Result
Mumbai Local Train : एसी लोकलमध्ये ‘फुकट्यांची’ गर्दी ! तिकीट तपासणी मोहीम सुरू

हिटणी (ता. गडहिंग्लज) मधील राजश्री सिद्धाप्पा तेरणी यांची ‘डीवायएसपी’ पदी निवड झाली असून त्या सध्या उपशिक्षणाधिकारीपदी कार्यरत आहे. नागांव (ता. हातकणंगले) मधील प्रतीक प्रकाश लंबे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर कौलगे (ता. गडहिंग्लज) मधील श्रद्धा चव्हाण यांची ‘डीवायएसपी’ पदी निवड झाली आहे. कसबा आरळे (ता. करवीर) मधील प्रिया काटकर यांची सरकारी कामगार अधिकारीपदी निवड झाली असून त्या सध्या राज्य कर निरीक्षकपदी कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com