मंत्री मुश्रीफ यांच्‍याकडून महापालिकेची जमीन हडप

सुनील कदम, सत्यजित कदम यांचा आरोप
hasan mushrif
hasan mushrifsakal
Updated on

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रमणमळा रि.स.नं. ८७५ या क्षेत्रातील १५ गुंठे जमीन त्यांचे चिरंजीव साजिद मुश्रीफ यांच्या नावे विकसन करारपत्र व वटमुख्त्यारपत्र करून घेतली. महापालिका सत्तेचा गैरवापर करून मुश्रीफ यांनी पालिकेच्या मालकीची जमीन संगनमताने लाटली आहे. लगतचा ९ मीटर रस्ता आणि खुली जागाही हडपल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

कदम बंधू म्हणाले, ‘‘रि.स.नं. ८७४ ला लागून रि.स.नं. ८७५ हे क्षेत्र आहे. ८७४ च्या दक्षिणेकडील बाजूस जयसिंग घोरपडे यांच्या मालकीचे ८१ गुंठे क्षेत्र होते. १९८१ ला फायनल लेआऊट झाला आहे. या क्षेत्राबाबत घोरपडे यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायद्याखाली विवरणपत्र भरले आहे. त्यानुसार केवळ ३ गुंठे क्षेत्र घोरपडे यांच्या नावे अतिरिक्त दिसत आहे. घोरपडे यांनी या मिळकतीतील सर्व क्षेत्र विक्री केले आहे. अतिरिक्त क्षेत्र शासन जमा आहे व त्यांच्या ७-१२ पत्रकी कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही. ८७५ या क्षेत्रातील पालिकेच्या मालकीची १५ गुंठे जमिनीवर कल्पतरू नावाची बहुमजली इमारत असून, यातील बहुतांशी सदनिका साजिद मुश्रीफ यांच्या नावे आहेत.

मंत्र्यांचे मूक समर्थन

मुश्रीफ यांनी सत्तेचा गैरवापर करत पालिकेची कोट्यवधीची जमीन लाटून ओपन स्पेसमध्ये इमारत बांधल्याचा कदम यांचा आरोप आहे. या प्रकरणात रि.स.नं. ८७४ या मिळकतीत ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या नावाने एक कंपनी भाडेतत्त्वाने व्यवसाय करत होती. कंपनीच्या संचालकांनी सामाजिक भान ठेवत त्यांच्या ताब्यातील मिळकतही बळकावली जात असताना तक्रारदेखील केली नाही. उलटपक्षी मूक समर्थन देऊन मंत्र्यांनी सहकार्यच केल्याचे कदम यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी याविषयी नगररचना विभागातील कागदपत्रे तपासूनच प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.

hasan mushrif
खवय्यांच्या पसंतीची राधानगरीची दूध आमटी महाराष्ट्रात प्रथम

बदनामीची नोटीस स्वीकारू

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी आमच्यावर या आरोपासाठी बदनामीचा दावा दाखल करावा, या दाव्याची नोटीस आम्ही स्वीकारू, असे आव्हानही माजी महापौर सुनील कदम आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले.

लवकरच आत्मदहन - कदम

दोन्ही मंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. त्यांच्या दबावाला बळी पडून जिल्हाधिकाऱ्यांनी माझी तक्रार लोकशाही दिनात घ्यायला नकार दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरच आत्मदहन आंदोलन करणार आहे, असेही कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com