कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीत एकावर खुनी हल्ला

परिसरात तणाव; पोस्टर फाडले, वर्चस्ववादातून कृत्य
Attack
AttackSakal
Updated on: 

कोल्हापूर - लक्षतीर्थ वसाहत परिसरातील सासने कॉलनीत वर्चस्ववादातून झालेल्या खुनी हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. संतोष सोनबा बोडके (वय ४०) असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा हल्ला झाला. अतिरक्तस्राव झाल्याने जखमीची प्रकृती गंभीर आहे. सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार घेऊन त्याला रात्री उशिरा खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेत आणखी एकजण जखमी असल्याचे समजते. मात्र, रात्री साडेबारापर्यंत एकच जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्चस्ववादातून दोन गटांतील वाद धुमसत आहे. आज रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित हल्लेखोरांनी संतोष बोडके याच्यावर खुनी हल्ला केला. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. काठी आणि दगड टाकून हल्लेखोर पसार झाले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले पोस्टर फाडण्याच्या कारणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. जखमी बोडके याच्या नातेवाईकांसह लक्षतीर्थ वसाहतीमधील तरुणांची सीपीआर आवारात रात्री उशिरा गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय आवारातही खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तलवारीसह अन्य शस्त्रांनी डोक्यात, पाठीवर, हातावर वर्मी हल्ला केला आहे. संतोष रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

किमान पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले. सहायक फौजदार भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रीच ठिकठिकाणी शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी पंचनामा करून हत्यारे ताब्यात घेण्याचे कामही पोलिसांकडून सुरू होते. घटनेची नेमकी माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com