esakal | कोल्हापूर - 'अंबाबाई'ची वैष्णवी मातृका रुपात सालंकृत पुजा
sakal

बोलून बातमी शोधा

'अंबाबाई'ची वैष्णवी मातृका रुपात सालंकृत पुजा

सप्तमातृका संकल्पनेतील ही मातृका सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे.

'अंबाबाई'ची वैष्णवी मातृका रुपात सालंकृत पुजा

sakal_logo
By
- संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज करवीर निवासिनी अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपात पुजा बांधण्यात आली. सप्तमातृका संकल्पनेतील ही मातृका सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे. वैष्णवी मातृका गरुडावर बसलेली असून तीने शंख,चक्र,गदा आणि कमळ हातामध्ये धारण केले आहेत. भगवान विष्णूप्रमाणे ती दागिन्यांनी, किरीट मुकूटांनी सजलेली आहे, अशी माहिती श्रीपूजक मयुर मुनिश्वर,सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी दिली.

हेही वाचा: करवीर निवासनी 'श्री अंबाबाई' त्र्यंबोली देवीच्या भेटीला

उदयनराजे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज 'श्री अंबाबाई'चे दर्शन घेतले. शासनाला शेतकऱ्यांना मदतीची सुबुद्धी येवो, अशी अंबाबाईकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. जे पेरले ते उगवले, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आयकरच्या कारवाईचे समर्थन केले. जनतेचा पैसा जनतेकडे गेला पाहिजे. मराठा आरक्षणाची चुकीच्या व्यक्तीच्या हातात मशाल असून जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र बंदबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी चुकीच्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगितले.

loading image
go to top