esakal | 'नेमिष्टे गॅंग 'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
sakal

बोलून बातमी शोधा

नेमिष्टे गॅंग

'नेमिष्टे गॅंग 'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत पसरविणार्‍या सराईत 'नेमिष्टे गॅंगला'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी आदेश काढले आहेत. टोळीप्रमुख अक्षय राजेंद्र नेमिष्टे, सदस्य गणेश बजरंग नेमिष्टे, राजेंद्र गजानन आरगे, शुभम राजेंद्र नेमिष्टे,सुंदर रमेश नेमिष्टे (सर्व रा.शेळके गल्ली) यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

हेही वाचा: राधानगरी धरण पुन्हा ओव्हरफ्लो!;पाहा व्हिडिओ

नेमिष्टे टोळीचा प्रमुख अक्षय नेमिष्टे याने साथीदारांच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्यात टोळीची दहशत प्रस्तापीत करण्यास सुरुवात केली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या ईसमांविरुध्द सर्वसामान्य नागरीकांच्या जीवीतास, मालमत्तेस धोका निर्माण करणे, जबरी गुन्हे, चोरी,, दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत.हे लक्षात घेवून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.दरम्यान नेमिष्टे या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. हद्दपारी प्राधिकरणाकडे पुरावे सादर करून सरकारी पक्षाची बाजू मांडण्याची कामगीरी पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सचिन पाटील, विलास किरोळकर, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील यांनी पार पाडली.

loading image
go to top