सौंदलगा : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (New English School Soundalga) २००७-०८ वर्षातील दहावीमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (Get Together) तब्बल १७ वर्षांनंतर पार पडला. तीच शाळा, तोच वर्ग, शिक्षकांच्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा अनोखा सोहळा माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी. जी. खाडे होते.