
कागल : कोरोनाचा फटका सर्वच घटकांना बसला आहे. उद्योग व्यवसाय अडचणीत आल्याने खासगी नोकऱ्यांवरही परिणाम झाला. तसेच परदेशात शिक्षण, नोकरी आणि सहलीला जाणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यातून कागल तालुक्यात नवीन पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत चांगलीच घटली आहे.
कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजविला आहे. संसर्गाची व्याप्ती आणि त्याची लागण होऊन रूग्ण वाढू लागल्याने देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशच स्तब्ध झाला. लॉकडाऊन काळात सर्वच कारखाने आणि व्यवसाय सुमारे तीन महिन्याहून अधिक काळ बंद राहिले. कोरोना संसर्गाचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींनी आपले व्यवसायधंदे तोट्यात गेल्याने कायमचे बंद केले तर अनेकांनी आपले व्यवसाय बदलून नवीन सुरू केले.
कोरोना महामारीचा नवीन पासपोर्ट काढण्यावरही परिणाम झाला आहे. कागल तालुक्यातील 83 गावातून वर्षाला सरासरी बाराशे ते तेराशे नवीन पासपोर्टची नोंदणी केली जाते. कागल पोलीस ठाण्यांतर्गत सहाशेहून अधिक तर मुरगूड पोलीस ठाण्यांतर्गत पाचशेहून अधिक नोंदणी झाली आहे. 2017 साली कागल पोलीस ठाण्यात 645 तर मुरगूड पोलीस ठाण्यातून 560 असे एकूण 1205 अर्ज पासपोर्ट करिता आले होते. 2018 साली कागल पोलीस ठाण्यात 696 तर मुरगूड पोलीस ठाण्यातून 520 असे एकूण 1216, 2019 साली कागल पोलीस ठाण्यात 732 तर मुरगूड पोलीस ठाण्यातून 558 असे एकूण 1290 अर्ज पासपोर्ट करिता आले होते.
चालू वर्षी याच्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पासपोर्ट करिता कागल पोलीस ठाण्यात 100, तर मुरगूड पोलीस ठाण्यात 80 जणांनी अर्ज दाखल केले होते. तर मार्च महिन्यापासून आजअखेर दोन्ही पोलीस ठाण्यात केवळ 341 लोकांनी पासपोर्ट करिता अर्ज दाखल केलेत. त्यामध्ये कागल पोलीस ठाण्यात 206 तर मुरगूड पोलीस ठाण्यातून 135 अर्जांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची
संख्या अत्यल्पच आहे.
हेही वाचा - चालत्या रोरो वरून ट्रक कोसळला अन्...
"कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्यामुळे परदेशात शिक्षण, नोकरी आणि सहलीला जाणारे भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे नवीन पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे."
- दत्तात्रय नाळे, (पोलीस निरीक्षक, कागल पोलीस ठाणे)
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.