Kolhapur : कोल्हापूर-रत्नागिरी हायवेवर रात्रीत घातला दरोडा; लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

कोल्हापूर-रत्नागिरी हायवेवर रात्रीत घातला दरोडा; लाखांचा ऐवज लंपास

शाहूवाडी : कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा गावानजिक तळवडे येथे रात्री धाडशी दरोडा पडला.दरोड्यात रोख रक्कम, दागिने,चार चाकी वाहन दरोडेखोरांनी चोरून नेले आहे. दरम्यान घरातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे.शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणेचे काम चालू आहे.

तळवडे येथे रहात असलेल्या शांतय्या शंकरय्या स्वामी (६०) यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे. रात्रीच्या वेळी दरोडेखोरांनी पुजारी आहेत का ? असा आवाज दिला. दरवाजा उघडताच सुमारे ७ ते ८ जणांनी घरात घुसून घरातील लोकांना मारहाण केली. घरातील दोन लाख रुपये रोख,सहा तोळे सोने आणि बोलेरो हे चार चाकी वाहन घेवून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान घरातील लोकांना बांधून ठेवण्यात आले होते. दोघांना मारहाण करण्यात आली आहे. एकाला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, एकाला किरकोळ मारहाण झाली आहे.

loading image
go to top