RTI अंतर्गत माहिती न देने तहसीलदाराला पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rti

RTI अंतर्गत माहिती न देने तहसीलदाराला पडले महागात

बेळगाव : माहिती अधिकार अंतर्गत (RTI) माहिती न दिल्याबद्दल बेळगावच्या तत्कालीन तहसीलदार मंजुळा नाईक यांना माहिती हक्क आयोगाने १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हलगा येथील भैरू देवाप्पा पाटील यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी माहिती अधिकार अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज केला होता.

हेही वाचा: इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनधारकांना करात मिळणार 'सवलत'

गावातील जमिनी संदर्भात त्यांनी यात विचारणा केली होती. पण तत्कालीन तहसीलदार नाईक यांनी माहिती पुरविली नाही. त्यामुळे पाटील यांनी आरटीआय अंतर्गत नेक्स्ट अपील प्रांताधिकाऱ्यांकडे केला. पण तेथूनही कोणताच प्रतिसाद न लाभल्याने त्यांनी अखेर राज्य माहिती आयोगाकडे याबाबत अपील केले होते. आयोगाने तहसीलदारांना नोटीस बजावून माहिती न दिल्याबद्दल विचारणा केली होती.

यास तहसीलदार नाईक यांनी निवडणुकीचे कारण पुढे केले. पण अर्ज करून ती वर्षे उलटली असल्याने तहसीलदारांना याबाबत आयोगाने जाब विचारत माहिती देण्यास दिरंगाई केल्याबलद्दल १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अर्जदाराच्यावतीने अॅड. प्रशांत कोंडे यांनी काम पाहिले.

Web Title: Not Giving Information Under Rti Cost The Tehsildar Dearly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RTI