गडहिंग्लजमध्ये बाधितांची संख्या सहावर

The Number Of Corona Victims In Gadhinglaj Is Six Kolhapur Marathi News
The Number Of Corona Victims In Gadhinglaj Is Six Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : येथील एका खासगी प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी केलेल्या 59 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याचा कौलगे (ता. गडहिंग्लज) गावचा पत्ता नमूद असला तरी ते मूळचे या गावचे नसल्याचे समजते. तालुक्‍यात आता कोरोना बाधितांची संख्या सहावर पोहचली आहे. 

सध्या बाधित रूग्णावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. संबंधित व्यक्ती पत्नी व मुलासह 15 मे रोजी रात्री येथे मुंबईहून आले आहेत. त्यानंतर येथील खासगी प्रयोगशाळेत त्यांनी स्वॅब दिला होता. शनिवारी सकाळी तातडीने त्यांना सीपीआर रूग्णालयात दाखल केले. खासगी प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून पत्नी व मुलाचा अहवाल निगेटीव्ह आहे.

कौलगेत रूग्ण आढळल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ उडाली. परंतु, बाधिताच्या आडनावची कोणतेही कुटुंब गावचे रहिवाशी नसल्याची चर्चा आहे. ते शेतातील एका घरात क्वारंटाईन होते. शनिवारी सकाळीच त्यांना सीपीआरमध्ये दाखल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. 

तालुक्‍यात कळवीकट्टे येथे पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर यमेहट्टी येथे दोन, काळामवाडी व भडगावात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. आज एकाचा अहवाल पॉझीटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुक्‍याची संख्या सहावर पोहचली आहे. प्रशासकीय यंत्रणेतून कौलगेतील रुग्णाची माहिती न आल्याने कंटेनमेंट झोनचा निर्णयही स्थगित ठेवल्याचे सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com