
पन्हाळा : गेले आठ दिवस कडक्याच्या उन्हामुळे उष्म्याने हैराण झालेल्या पन्हाळगड व परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जणू वाजत गाजत सतत हुलकावणी देणाऱ्या वळीव पावसाने वादळ, वाऱ्या शिवाय हजेरी लावली यावेळी सुमारे एक तास संततधार कोसळलेल्या वळवाच्या पहिल्या पावसाने पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर तटबंदीच्या शिळा कोसळल्या पन्हाळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी व परिसरात गेले काही दिवस सकाळी ढगाळ वातावरण व दुपारी कडक्याच्या उन्हामुळे जाणवणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते.