कोल्हापुरात आवाज सतेज पाटलांचाच ; कार्यकर्त्यांचे स्टेटस व्हायरल

विधान परिषदेत दिसली कारखाना निवडणुकीची झलक : तडजोड राजाराम कारखान्यासाठी नाही
whtas up
whtas upEsakla
Summary

विधान परिषदेत दिसली कारखाना निवडणुकीची झलक : तडजोड राजाराम कारखान्यासाठी नाही.

कोल्हापूर : जिल्‍ह्यातील विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election 2021 ) झालेली तडजोड ही राज्य पातळीवरील निर्णय आहे, ‘राजाराम’साठी (Rajaram)ताकदीने लढायचे आहे, असा इशाराच पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला जात आहे. अनेकांच्या स्टेटसलाही अशी आव्हानात्मक भाषेचे संदेश फिरत असून त्यामुळे ‘राजाराम’ची निवडणूकही अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्यात २००७ पासून मतभेद सुरू झाले. त्यानंतर संधी मिळेल तिथे दोन्ही गटांकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न झाला. २०१४ ची विधानसभेची निवडणूक वगळता इतर ठिकाणी महाडिक गटाचीच पीछेहाट झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ म्हणत पाटील यांनी तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात रान उठवले. महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार असूनही पाटील यांच्या गटाने त्यांच्या विरोधात ताकद लावली. त्यात महाडिक यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर ‘आमचं ठरलंय, दक्षिण उरलंय’ असा नारा विधानसभेत देत अमल महाडिक यांचा पराभव केला. ही निवडणूक संपताच ‘आता गोकुळ उरलंय’ म्हणत महाडिक यांना ‘गोकुळ’मध्येही पाटील यांनी पराभूत केले.

whtas up
आघाडीच बँकेवर 'लक्ष'; महाडिक, आवाडेंची जबाबदारी पी. एन, कोरेंवर

अलीकडेच जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील असाच अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे होती; पण राज्य आणि देश पातळीवर भाजप, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधान परिषद बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आणि या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी अनपेक्षित माघार घेतल्याने पालकमंत्री पाटील बिनविरोध झाले. यात ‘राजाराम’ची तडजोड झाल्याची चर्चा सुरू असताना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र ‘राजाराम’साठी ताकदीने लढायचे, विधान परिषदेची तडजोड ही राज्य पातळीवरील होती असे स्टेटस ठेवून इशारा दिल्याने ‘राजाराम’मध्येही पाटील-महाडिक सामना रंगण्याची शक्यता आहे.

सबुरीने कोण घेणार

विधान परिषदेतील पाटील यांच्या बिनविरोध निवडीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिक-पाटील कुटुंबातील संघर्ष कमी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचवेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही हा संघर्ष कमी होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे; पण या दोन तुल्यबळ नेत्यांत सबुरीने कोण घेणार, हा खरा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com