पट्टणकोडोली गावाबाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत मध्यरात्री भोंदूबाबा, मांत्रिक येऊन असे प्रकार करतात.
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) स्मशानभूमीत (Pattankodoli Cemetery) जादूटोणासारखा (Witchcraft) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन पुरुष, दोन स्त्रिया, त्यांच्या फोटोला टाचण्या तसेच काळ्या बाहुल्या, लिंबू, काळे कापड, असे अर्धवट जळालेल्या अवस्थेत साहित्य आढळले आहे. या अघोरी घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.