२० गव्यांची स्वारी; ग्रामस्थांची भंबेरी

उचत येथे रस्त्यावर गव्यांचा कळप; ग्रामस्थांच्या शांततेमुळे गवे जंगलाकडे
Gava
GavaSakal

शाहूवाडी - मलकापूर ते पावनखिंड मार्गावरील उचत गावच्या हद्दीत आज सकाळी २० गव्यांच्या कळपाचे दर्शन लोकांना झाले. कोळगावच्या शिवारातून गव्यांचा हा कळप उचत मार्गे ऐनवाडी जंगल परिसराकडे गेला.

अचानकपणे रस्त्यावर आलेल्या २० गव्यांचा कळप पाहून मात्र रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची भंबेरीच उडाली. वन विभागाला ही माहिती मिळताच मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, वनरक्षक अक्षय चौगुले, विशाल पाटील व त्यांच्या पथकाने कळपाचा माग घेतला. कोळगाव, उचत, मुटकलवाडीमार्गे हा कळप येलूरपैकी जठारवाडी परिसरातील बंधाऱ्यावर पाण्याच्या शोधात पोहोचला असल्याचे आढळले.

उचत ग्रामस्थांचा आदर्श

जंगली प्राणी दिसताच अनेक वेळा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न बहुतांश ठिकाणी होतो. त्यातून ते प्राणी घाबरून बिथरतात व सैरावैरा पळत सुटतात. त्यातून अशा प्राण्यांना कधी जीव गमवावा लागल्यासारख्या किंवा बिथरल्याने इतरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आज उचत ग्रामस्थांनी गव्यांचा कळप दिसताच दंगा न घालता गव्याच्या कळपास शांततेत जंगलाच्या दिशेने जाऊ देऊन इतरांपुढे आदर्श ठेवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com