esakal | परवानाधारक रिक्षाचालकांनो 'या' लिंकवर करा अर्ज: अनुदान होईल थेट बँकेत जमा
sakal

बोलून बातमी शोधा

परवानाधारक रिक्षाचालकांनो 'या' लिंकवर करा अर्ज

परवानाधारक रिक्षाचालकांनो 'या' लिंकवर करा अर्ज

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : परवानाधारक रिक्षाचालकांचे (permitted auto driver) अनुदान थेट बँकेत जमा होणार आहे. यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांनी केले आहे. ही माहिती त्यांनी फेसबुक अकौंटवरून दिली आहे.(permitted-auto-driver-apply-for-Grants-on-government-website-kolhapur-news)

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना रु. १५००/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'आयसीआयसीआय' बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

हेही वाचा- तलवार नको, अभ्यास करू : संभाजीराजेंचे आवाहन

यासाठी ही लागणार कागदपत्रे

परवानाधारक रिक्षाचालकांचे ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, लायसन्स आणि आधार क्रमांकाची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर भरायची आहे. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठीची लिंक:

https://transport.maharashtra.gov.in/.../Autorickshaw

या वेळेतच करा अर्ज

परवानाधारक रिक्षाचालकांनी विहीत कागदपत्रे सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेतच वेबसाईटवरती सादर करायची आहेत.

loading image