मुख्य न्यायमूर्तींची सकारात्मक चर्चा; बार असोसिएशनच्या सचिवांची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्कीट बेंच व्हावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपकंर दत्ता यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
Justice dipankar datta
Justice dipankar dattasakal
Summary

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्कीट बेंच व्हावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपकंर दत्ता यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्कीट बेंच (Kolhapur Circuit Bench) व्हावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती दीपकंर दत्ता (Dipankar Datta) यांच्याशी सकारात्मक चर्चा (Duscuss) झाली. मी निर्णय घेतो मला वेळ द्या असे त्यांनी सांगितल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके आणि विजयसिंग देशमुख यांनी हि माहिती दिली.

दरम्यान मुंबईत सर्वपक्षीय बैठक सध्या सुरू असून तेथील निर्णयही लवकरच जाहीर करण्यात येईल.

Justice dipankar datta
निपाणीसह परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपकंर दत्ता यांनी चर्चेसाठी बोलवले होते. सायंकाळी साडेपाच ते सात या दरम्यान शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर चर्चा केली. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी सर्कीट बेंच कोल्हापुरात का आवश्यक आहे याची माहिती दिली. तसेच कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाची इमारत ऐतिहासिक असून येथे सर्कीट बेंच होऊ शकते. असे सांगून त्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रेही दाखविण्यात आली. त्यानंतर चर्चेनंतर न्यायमूर्तींनी मी निर्णय घेतो मला वेळ द्या असे सांगितल्याचे ताटे-देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील निर्णयासाठी सर्व पदाधिकारी मुंबई येथील महिला विकास मंडळाचे सर्वपक्षीय बैठकीत आता सहभागी झाले आहेत.

कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह सर्वपक्षीय बैठकीत होणारा निर्णय लवकरच खंडपीठ कृती समितीकडे पाठविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई, ॲड. विवेक घाटगे, ॲड. श्रीकांत जाधव, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. गिरीश खडके, ॲड. संतोष शहा, ॲड. सुधीर चव्हाण, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. विजय ताटे-देशमुख, बारचे माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. प्रकाश मोरे, ॲड. विजय महाजन, ॲड. एन. बी. भांदीगरे, ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. आर. बी. पाटील, ॲड. युवराज नरवंनकर, ॲड. सर्जेराव खोत, ॲड. विनय कदम, ॲड. सचिन मंडके, ॲड. विश्वास चिडमुंगे, ॲड. संदीप चौगले, ॲड. तृप्ती नलवडे आदींचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com