Ichalkarnji : मार्च अखेरीस शक्य पालिकेच्या निवडणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ichalkarnji corporation

Ichalkarnji : मार्च अखेरीस शक्य पालिकेच्या निवडणुका

इचलकरंजी : पालिका विद्यमान सभागृहाची या वर्षाअखेरीस मुदत संपणार आहे. तत्पूर्वी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता फार धुसर आहे. त्यामुळे विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च अखेरीस होतील, असे राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त होत आहेत.

सध्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यानंतर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग येणार आहे. विद्यमान सभागृहाची मुदत २९ डिसेंबरला संपणार आहे. सध्या केवळ प्रारुप प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून दिले आहेत. याबाबतचा अहवाल पाठविण्याची मुदत ३० नोव्हेंबर आहे. १ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. किमान पंधरा दिवस तरी मतदार याद्या प्रभागनिहाय फोडण्याचे काम चालणार आहे. त्यावर हरकती व सूचना मागवल्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. दरम्यान, आरक्षण टाकण्याची प्रक्रिया याच कालावधीत होणार आहे. यासाठी किमान निम्मा फेब्रुवारी महिना संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेर अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

इचलकरंजी पालिका निवडणूक दृष्‍टिक्षेप

  • एकूण प्रभाग - ३२

  • एकूण जागा - ६४

  • नवीन जागा - २

  • मागासवर्गीय आरक्षीत जागा - ६

  • ओबीसी आरक्षीत जागा - १७

  • सर्वसाधारण महिला जागा - २०

  • सर्वसाधारण खुल्या जागा - २१

मतदारांची संख्या अशी

सुमारे ९ हजार लोकसंख्या गृहीत धरुन प्रभाग रचना करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित प्रभागातील मतदार याद्या निश्चीत केल्या जाणार आहेत. इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रात सर्वसाधारणपणे एका प्रभागात किमान ६ हजार ५०० मतदारांची संख्या असणार आहे.

प्रभागांचा आकार बदलणार

गत निवडणूकीत दोन नगरसेवकांचा प्रभाग होता. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत जैसे थे परिस्‍थिती राहणार आहे. मात्र प्रभागाच्या भौगोलिक सिमा कांही अंशी बदलण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेक प्रभागांचे आकार कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top