esakal | पीपीई किट, मास्कचा रोज तीन टन कचरा 
sakal

बोलून बातमी शोधा

 PPE kit, three tons of mask waste per day

सीपीआर, इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयासह सर्व कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटलमधील कोरोनाच्या कचऱ्याचा समावेश आहे. साधारणपणे दररोज कोरोनाचा तीन टन कचरा जमा होतो. 

पीपीई किट, मास्कचा रोज तीन टन कचरा 

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर  : जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमधून व प्रयोगशाळेतून जो जैववैद्यकीय कचरा निघतो, त्यावर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया करून तो नष्ट केला जातो. यातच आता कोरोनाच्या कचऱ्याची भर पडली आहे. या कचऱ्यात पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्डसह अन्य साहित्याचा समावेश आहे. सीपीआर, इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयासह सर्व कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटलमधील कोरोनाच्या कचऱ्याचा समावेश आहे. साधारणपणे दररोज कोरोनाचा तीन टन कचरा जमा होतो. 

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा संसर्ग पोहचला. पाच महिन्यांत कोरोनाची रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे, कोविड सेंटर, काळजी केंद्र, सीपीआर रुग्णालय, इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयासह खासगी रुग्णालयातूनही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा साठतो. हा कचरा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी येथील एस.एस.एन्टरप्राईजेस यांच्याकडून या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. 

अशी लावली जाते विल्हेवाट 
जिल्ह्यात सर्वाधिक कचरा सीपीआर हॉस्पिटलमधून साठतो. येथून रोज 1 टन कोरोनाचा येतो. तर इतर कोविड सेंटर व हॉस्पिटलमधील कचरा हा दिवसातून एकदा जमा केला जातो. कोरोना रुग्णांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ व प्लास्टिक ताट तसेच रॅपर्स हा कचरा जमा करून तो निर्जंतुकीकरण करून 24 तास आहे, त्या जागेवर ठेवला जातो. त्यानंतर तो कचरा या प्रक्रिया केंद्रांकडे पाठवला जातो केंद्रातील बॉयलरमध्ये जाळून नष्ट केला जातो. 

दृष्टिक्षेपात 
* एकट्या सीपीआरमधून रोज 1 टन कचरा 
*प्रत्येक कोविड सेंटरमधून रोज एकदाच कचरा संकलन 
*कचरा संकलनासाठी वाहने- 13 
*प्रत्यक्ष प्रक्रियेत कर्मचारी- 40 ते 50 

नियमित जैव वैद्यकीय कचऱ्याच्या दुप्पट आता कोविडचा कचरा जमतो. प्लास्टिक कचराही आहे. त्यामुळे कोरोनाच कचरा टाकताना त्याचे विलगीकरण करणे अत्यावश्‍यक आहे. मास्क, पीपीई किट नष्ट करण्यासाठी पर्यायी व्यवस्था आवश्‍यक. 
- किशोर पवार, प्रमुख, एस.एस.एंटरप्राईजेस कंपनी . 

सध्या पीपीई किट, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क आदी प्लास्टिक साहित्य हे जैव वैद्यकीय कचरा म्हणून प्रक्रियेसाठी पाठवले जाते, मात्र हे नष्ट करताना संबंधित यंत्रणेला त्रास होतो. प्लास्टिकचे साहित्य नष्ट करताना कार्बनचे प्रमाण वाढते. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचा कचरा हा सीपीआर येथून येतो 
- निखिल पडळकर, महापालिका. 
 

loading image
go to top