
कोल्हापूर : जिल्ह्यात खासगी सावकारांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे येथे एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. हलसवडे येथे एकाने आत्महत्या केली. पन्हाळा तालुक्यातील आवळी येथे खासगी सावकाराचा त्रास होत असल्याच्या अर्जावरून जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने छापा टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. यातून जिल्ह्यात खासगी सावकारांचा त्रास कसा वाढत आहे, हे दिसून येत आहे.