esakal | जयसिंगपूर: भारत बंद अंतर्गत विविध पक्ष, संघटनांनी सोमवारी क्रांती चौकात निदर्शने केली । bharat band
sakal

बोलून बातमी शोधा

bharat band

शिरोळ तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद; क्रांती चौकात निदर्शने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयसिंगपूर : कृषी कायदे, महागाईच्या विरोधात भारत बंदला सोमवारी (ता.२७) शिरोळ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात विविध संघटनांनी मोर्चा काढून क्रांती चौकात निदर्शन केली. यावेळी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी गाव चावडी कार्यालया समोरून सर्व संघटना एकत्रित येऊन गांधी चौक ते क्रांती चौक असा मोर्चा काढला.

हेही वाचा: मार्केटयार्डात कडकडीत बंद; भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

क्रांती चौकात आल्यानंतर निदर्शने करीत प्रचंड घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. शांताराम कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसचे सुभाष भोजणे, सदाशिव पोपळकर, बाबासाहेब नदाफ, कॉ रघुनाथ देशिंगे, प्रा गजानन चव्हाण व प्रा. प्रभाकर माने यांनी सरकारच्या निष्क्रियपणावर टीका केली. सरकारने कृषी व कामगार विरोधी कायदे मागे घेऊन कामगार व तमाम शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सातत्याने चालू राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला.

हेही वाचा: भारत बंदच्या पाठींब्यासाठी सांगलीत धरणे आंदोलन

यावेळी अमरसिंह निकम, बंडा मिनियार, प्रा.प्रकाश मेटकर, डॉ.अतिक पटेल, डॉ.तुषार घाटगे, प्रा.ए.एस.पाटील, अशोक शिरगुप्पे, डॉ.महादेव सुर्यवंशी, डॉ.सुर्यवंशी, डॉ.नितीश सावंत, प्रा.कांकरंबे, संदीप लाटकर, मारुती जाधव, प्रदीप साळुंखे, शाहीर शब्‍बीर पटेल, खंडेराव हेरवाडे, कॉम्रेड फुलाबाई बेडगे, सुनीता पवार, वत्सला कोळी,हणमंत पुजारी, भगवान कांबळे यांच्यासह लाल बावटा कामगार युनियन, राष्ट्रसेवा दल, शिरोळ तालुका पुरोगामी संघटना, समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शेतकरी संघटना, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना(सुटा), गोकुळ कामगार संघटना, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना व राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top