Pune Porsche Accident : शरद पवारांना सोडून गेलेल्या मुश्रीफांनी मला दम दिलाय, पण मी..; आमदार धंगेकरांचा थेट इशारा

‘वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांचे लागेबांधे आहेत.
Pune Accident Case MLA Ravindra Dhangekar vs Hasan Mushrif
Pune Accident Case MLA Ravindra Dhangekar vs Hasan Mushrifesakal
Summary

'आम्ही घाबरणार नाही. अब्रुनुकसानीप्रकरणी मला तुरुंगात जायला लागले तरीही मी पुण्याचा आवाज कोणाला दाबू देणार नाही.'

कोल्हापूर : ‘वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांचे लागेबांधे आहेत. डॉ. तावरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी असूनही मुश्रीफ यांनी तावरे यांना पाठीशी घातले. पुण्यातील पब संस्कृती मुश्रीफांनी बंद केली तर त्यांच्यासमोर लोटांगण घालू’, असे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सांगितले. धंगेकर काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

दरम्यान, कारवाईच्या भीतीने वडिलांसारख्या शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडून गेलेल्या मुश्रीफ यांनी मला दम दिला आहे, त्याला आम्ही घाबरणार नाही. अब्रुनुकसानीप्रकरणी मला तुरुंगात जायला लागले तरीही मी पुण्याचा आवाज कोणाला दाबू देणार नाही’, असा पलटवारही त्यांनी केला.

Pune Accident Case MLA Ravindra Dhangekar vs Hasan Mushrif
Kolhapur Election Results : मतमोजणीदिवशी कोल्हापुरातील 'हे' मार्ग राहणार बंद; वाहतूक मार्गात बदल, पार्किंगचीही स्वतंत्र व्यवस्था

आमदार धंगेकर म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ हे चुकीच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत. डॉ. तावरे यांचे मुश्रीफ यांच्यासोबत लागेबांधे आहेत. तावरे हा अनेक प्रकारणांमध्ये दोषी आहे. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. हे माहिती असूनही त्यांना महत्त्वाच्या पदावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. डॉ. काळे यांनीही मुश्रीफ यांचे नाव घेतले आहे. यांच्या मनासारखे अधिकारी नियुक्त करून डॉ. तावरे यांना क्लीन चिट देण्याचे काम सुरू असल्याची शंका आहे.

दरम्यान, माझे पुणे सुरक्षित नसेल तर आमदारकीचा मुकुट मला गरजेचा नाही. पोलिसही सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत. याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी माझ्यावर हक्कभंगाची कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रात बिल्डर लोकांचे राज्य आहे. उडता पंजाबसारखी संस्कृती पुण्यात येत आहे. पुणे अपघातातील आरोपीचे रक्त फेकून देऊन दुसऱ्याचे रक्त घेतले. भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत आहे.’

मी पुणेकरांचा आवाज

‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि तेथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यांना चुकीच्या मार्गाला लावणारी एक यंत्रणा कार्यरत आहे. राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा शेवट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण, मी पुणेकरांचा आवाज आहे’, असेही धंगेकर म्हणाले.

Pune Accident Case MLA Ravindra Dhangekar vs Hasan Mushrif
Adani Power Plant : तब्बल 'इतक्या' गावांचा विरोध डावलून अदानी प्रोजेक्टचं काम सुरू; नागरिकांतून तीव्र संताप

आरोग्य अधिकाऱ्याला पाठवले सक्तीच्या रजेवर

धंगेकर म्हणाले, ‘आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी पुण्यात आणला होता. त्यानंतर सावंत यांच्या मुलाने आम्हाला एक कोटी मिळाले पाहिजेत, अशी मागणी केली. काही टेंडर काढली जाणार आहेत, यातून पाच कोटी रुपये आम्हाला कसे मिळतील हे तुम्ही पाहिले पाहिजे, यासाठीच तुम्हाला आम्ही आणले असल्याचे सांगितले. पुन्हा त्या आरोग्य अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, हा कुठला न्याय आहे?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com