पुणे-बंगरुळू हायवेवर भीषण अपघात; ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक

ट्रॅक्टरला जोडलेल्या उसाच्या ट्रॉलीस या दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली.
Accident
Accidentsakal
Updated on
Summary

ट्रॅक्टरला जोडलेल्या उसाच्या ट्रॉलीस या दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली.

उजळाईवाडी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काल (४) रोजी रात्री ९ च्या दरम्यान पेट्रोलपंपा नजीक कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दिलीप इंद्रजीत चौहान (वय २१) व मोहितकुमार टुनटुन चौहान (वय २३) (दोघे मुळगाव बाराबंकी उत्तर प्रदेश सध्या रा. गोकुळ शिरगाव ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर जागीच सोडून फरार झाला. या अपघाताची नोंद पोलिस गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांत रात्री उशिरा झाली असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल खोत करीत आहेत.

Accident
'नवाब मलिकांनी मंत्र्यांची चिंता करावी, उगाच डायलॉगबाजी करू नये'

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव येथील एका फर्निचर कंपनीत काम करणारे दोन युवक मित्राची दुचाकी गाडी (क्र. एम एच ०९ एफ एफ ९२६५ घेऊन कामानिमित्त कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी मयूर पेट्रोल पंपासमोर समोरून कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या (क्र. एम एच ०९ एफ क्यू ६५५६) या ट्रॅक्टरला जोडलेल्या उसाच्या ट्रॉलीस या दुचाकीस्वाराने पाठीमागून जोराची धडक दिली. ऐन दिवाळीत कष्टकरी चौहान कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Accident
कोल्हापुरात भरला म्हशींचा 'फॅशन शो'; पहा 'खास' फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Radhanagari dam water storage latest
Chandrakant Patil latest statement on Sharad Pawar
Hasan Mushrif hospital inspection Kolhapur
Kalamba resident dies in highway accident
Marathi News Esakal
www.esakal.com