esakal | राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले; सलग चार दिवस मुसळधारेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी - राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे गुरुवारी सायंकाळी उघडले. धरणातील पाण्याच्या विसर्गाने भोगावती नदीला पूर आला आहे.

हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले; सलग चार दिवस मुसळधारेचा इशारा

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या चार आणि सहा क्रमांकाच्या दरवाजातून प्रत्येकी 1428 तर विद्युत विमोचनातून 1400 असा एकूण 7012क्यूसेक विसर्ग राधानगरी धरणातून सध्या सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी सुद्धा कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर वाढली असून ती दुपारी 28 फूट पाच ईंचापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 18 बंधारे आजही पाण्याखाली आहेत.

हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला असून काल पासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर काल दुपारी 24 फुटापर्यंत असणारी पाणी पात्री आज दुपारपर्यंत साडेचार फुटांनी वाढली आहे. पावसाचा जोर कायम असून सकाळपासून काही क्षण सूर्यदर्शन सुद्धा झाले आहे.

जिल्ह्यातील राधानगरी सहपाटगाव धरण सुद्धा भरले असून वेदगंगा नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राधानगरी धरणात 24 तासात 92 मिलिमीटर पाऊस झाला असून एक जून पासून आज पर्यंत तब्बल 4240 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे, गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत राधानगरी धरण परिसरात 4311 इतका पाऊस झाला होता. पावसाची आकडेवारी लक्षात घेता राधानगरी धरण क्षेत्रात गतवर्षीपेक्षा शंभर मिलिमीटर पाऊस आजच्या तारखेपर्यंत कमीच झाला आहे.

दोन्ही नदीकाठच्या गावांना सावधानगिरीचा इशारा देण्यात आला आहे. धरणात आज सायंकाळी 25.10 टीएमसी पाणी साठा झाला.साठवणक्षमता संपत आल्याने धरणाचे पाच वक्राकार दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडले आहेत.हे धरण गत वर्षी 9 सप्टेंबरला पूर्ण भरले होते.पूर नियंत्रणासाठी पाणीसाठ्यात वाढ व पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक याचा ताळमेळ घालून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग करण्यात आल्याने धरण चार दिवस उशिरा भरले.धरण क्षेत्रात आज आखेर 3015 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने जलाशय पाणीपातळीत झपाट्याने वाढ सुरू राहिल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.धरणातून 7012 क्युसेस पाणी विसर्ग सुरू आहे.भोगावती नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात 24 तासात 92 मिलिमीटर तर आज सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या दहा तासात 118 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

loading image
go to top