Radhanagari Bus:‘ती’ निघाली पंढरपूरला; पण पोहोचली पुण्याला ;राधानगरी-पंढरपूर बसचा कोल्हापुरातून मार्ग बदलला; प्रवासी अचंबित

Pandharpur Service Diverted to Pune: वारकऱ्यांच्या मागणीनंतर सुरू झालेली राधानगरी-पंढरपूर एसटी बस कोल्हापुरातून ऐनवेळी पुण्याकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला; मात्र दुसऱ्या दिवशी बस पुन्हा पंढरपूरला रवाना झाली.
The Radhanagari-Pandharpur ST bus was diverted to Pune from Kolhapur, causing confusion among passengers.

The Radhanagari-Pandharpur ST bus was diverted to Pune from Kolhapur, causing confusion among passengers.

esakal

Updated on: 

सरवडे : राधानगरी आगाराने पहिल्यांदाच राधानगरी ते पंढरपूर बस सेवा सुरू केली. सरवडे, सोळांकूरसह मार्गावरील अनेक गावांत वारकऱ्यांनी उत्साहाने या बसचे पूजन केले आणि गाडीचे प्रस्थान झाले. पण, बस कोल्हापुरात गेली आणि ‘ती’ पंढरपूरला न जाता विद्येच्या पंढरीला म्हणजे पुणे येथे पोहोचली. या बसमधील पंढरपूरला जाणारे काही प्रवासी कोल्हापूर सीबीएसवरून पंढरपूर बसमध्ये बसवले आणि राधानगरीवरून आलेली बस ऐनवेळी पुण्याला सोडली.

Loading content, please wait...