esakal | 'कर्ज घेताना खबरदारी घ्या; नियमबाह्य वसुलीविरोधात फिर्याद द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

'कर्ज घेताना खबरदारी घ्या; नियमबाह्य वसुलीविरोधात फिर्याद द्या'

कोणी वसुली करत असेल तर त्यांच्याविरोधात पोलिसांत ठाण्यात फिर्याद द्यावी. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

'कर्ज घेताना खबरदारी घ्या; नियमबाह्य वसुलीविरोधात फिर्याद द्या'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कर्जाची वसुली करण्यासाठी नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करून कोणीही कर्ज वसुली करू शकत नाही. अशाप्रकारे कोणी वसुली करत असेल तर त्यांच्याविरोधात पोलिसांत ठाण्यात फिर्याद द्यावी. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. वसुलीसाठी नागरिकांना त्रास देणाऱ्यांना संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

हेही वाचा: राज्य सरकारला फडणवीसांचं म्हणणं उशिरा कळलं - गोपीचंद पडळकर

फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीविरोधात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यांना कारवाईचे आश्वास दिले होते. याबाबत कोणती कारवाई झाली, यासंदर्भाने रेखावार म्हणाले, ‘‘फायनान्स कंपन्यांनाही कर्ज वसुलीसाठी नियम आहेत; मात्र त्याचे उल्लंघन करून कोणी नियमबाह्य पद्धतीने वसुली करत असेल, तर त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद द्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येईल. वस्तुस्थिती अशी आहे, की अद्याप याबाबतची एकही तक्रार दाखल झालेली नाही. नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. त्यानंतरच कारवाई करता येईल. सक्तीने वसुली होत असले तर गावातील लोकांनी संघटितपणे कायद्याच्या चौकटीत राहून विरोध केला पाहिजे तरच याला आळा बसेल.’

हेही वाचा: कोरोनामुळे मृत्यूचा उल्लेख डेथ सर्टिफिकेटवर होणार, नवे नियम जारी

कर्ज घेताना खबरदारी घ्या!

काही कंपन्यांनी कर्जदाराची परतफेडीची कुवत न पाहता नियमबाह्य कर्ज दिले आहे; पण सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे कर्ज नियमात बसते. नंतर वसुलीसाठी त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेऊनच कर्ज घेतले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले.

loading image
go to top