कोल्हापूरला महापुराचा धोका? पंचगंगेच्या पाणी पातळीत किती वाढ, काळम्मावाडी-राधानगरीची काय आहे स्थिती? जाणून घ्या..

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
Panchganga River
Panchganga Riveresakal
Summary

पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंचा पर्यंत गेली आहे. तर, धरणांमधील पाणीसाठा ही समाधानकारक वाढला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पाणी पातळी रात्री 1 ते आज 25 जुलै 2023 रोजी सकाळी 6 पर्यंत 40 फूट 4 इंचावार स्थिर राहिली आहे.

Panchganga River
Sindhudurg Flood : सिंधुदुर्गात वरुणराजाची जोरदार मुसंडी, कणकवलीला महापुराचा धोका; आंबोली, करुळ घाटात कोसळल्या दरडी

तसेच 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चिंता वाढवली आहे. आठवडा भर झालेल्या धुवांधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. याचसोबत पंचगंगेसह नद्यांची पाणी पातळी ही रहिवास क्षेत्राकडं वाढू लागली आहे.

प्रत्येक तासाला इंचा इंचानी वाढणारी पाणी पातळी रात्री एक पासून पहाटे सहा पर्यंत स्थिर राहिल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणी पातळी कमी होईल, असा अंदाज आहे.

Panchganga River
Satej Patil : पक्षात येण्याची हसन मुश्रीफांची ऑफर सतेज पाटील स्वीकारणार? काँग्रेस आमदारानं केला मोठा खुलासा

पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंचा पर्यंत गेली आहे. तर, धरणांमधील पाणीसाठा ही समाधानकारक वाढला आहे. राधानगरी धरणात 90 टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. काळम्मावाडी धरणात ही 50 टक्के पाणसाठा झाला आहे.

राधानगरी 93.55 तर काळम्मावाडी 51.58 टक्के भरले

जिल्ह्यातील राधानगरी आणि काळम्मावाडी धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरण 94 टक्के पर्यंत भरले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी धरणे भरतील की नाहीत अशी परिस्थिती असताना आठवड्यामध्ये ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

  • राधानगरी धरण 8.36 टीएमसी पैकी 7.82 टीएसमी (93.55 टक्के) भरले आहे.

  • काळम्मावाडी (दूधगंगा) धरण 25.39 टीएमसी पैकी 13.10 टीएमसी (51.58 टक्के) भरले आहे.

  • वारणा (शिराळा) धरण 34.39 टीएमसी पैकी 26.66 टीएमसी (77.50 टक्के) भरले.

  • राधानगरी पाण्याचा विसर्ग : 1400 क्यूसेक

  • पाण्याखाली असणारे बंधारे : 82

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com