esakal | कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

गुडाळवाडीजवळ डोंगराला लागून नदीच्या काठाने असलेल्या रस्त्यावर डोंगराचा काही भाग आज सकाळी ढासळला.

कोल्हापूर - गुडाळवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

sakal_logo
By
सुरेश साबळे

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील गुडाळवाडी - करंजफेण रस्त्यावर दरड कोसळल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली. गेले काही दिवस परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. जोराचा पाऊस सुरू असताना गुडाळवाडीजवळ डोंगराला लागून नदीच्या काठाने असलेल्या रस्त्यावर डोंगराचा काही भाग आज सकाळी ढासळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु राधानगरी, करंजफेण, गुडाळवाडी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात, त्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार

करंजफेणसह कुडूत्री येथील नागरिकांचा कसबा तारळे बाजारपेठेत रोजचा वावर असतो. ऐन गौरी-गणपतीच्या सणात दरड कोसलळ्याने आज या रस्त्यावरील वाहतून रखडली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दरडीचे ढिगारे हटवून रस्ता रिकामा करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

loading image
go to top