कोल्हापूर : पाऊस उघडला; महापुराचा धोका कायम

कोल्हापूर येथे पुणे बेंगलोर महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर : पाऊस उघडला; महापुराचा धोका कायम

कोल्हापूर : सलग तीन दिवस मुसळधार पडणार्‍या (heavy rain) पावसाने आज सकाळी काही प्रमाणात उघडीप दिली. तब्बल 48 तासानंतर आज कोल्हापूरकरांना सूर्यदर्शन झाले. पंचगंगा नदीची पातळी मध्यरात्री 56 फुटांवर होती, सकाळी 11 वाजता 55.4 फुटापर्यंत कमी आली आहे. आणखी कमी येत आहे. अद्याप राधानगरी धरणाचे (radhanagari dam) दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे पाऊस उघडला असला तरीही महापुराचा धोका कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur rain update) 104 हून अधिक बंधारे पाण्याखाली असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. तसेच कोल्हापूर येथे पुणे बेंगलोर (nati0nal highway 4) महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी पुलाची शिरोली परिसरात सांगली फाटा परिसरात दोन हजाराहून अधिक वाहने थांबवून आहेत.

कोल्हापूर : पाऊस उघडला; महापुराचा धोका कायम
कोल्हापूर: नृसिंहवाडीत दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली

शहरात रात्रभर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली तर सकाळी सूर्यदर्शन झाल्यामुळे जनजीवन पूर्व मार्गावर येण्याची शक्यता आहे. डोंगरी भागात तालुक्यात अतिवृष्टी पेक्षाही अधिक पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी महापुराचे पाणी घुसल्यामुळे व्हीनस कॉर्नर, तावडे हॉटेल, कसबा बावडा शिये मार्ग, लक्ष्मीपुरी कुंभार गल्ली सिद्धार्थ नगर येथे अद्यापही पुराचे पाणी ओसरले नाही.

फ्री कॅचमेंट एरियामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विक्रमी 24 तासात 212 मिलिमीटर पाऊस झाला आहे. डोंगरी भागात भूस्खलन होत असून शक्यतो या भागातील प्रवास टाळणेच योग्य आहे. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा अनिश्‍चित कालावधीसाठी बंद असून शिंगणापूर बालिंगा नागदेववाडी येथील उपसा केंद्रेही पाण्याखाली आहेत. एनडीआरएफच्या तीन तुकड्या दाखल झाले असून आणखी पाच तुकड्यांची मागणी करण्यात आली आहे.

पाऊस कमी होत असला तरीही महापुराचा धोका कायम असल्याने शक्य असल्यास घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीचा पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जात आहे. एकंदरीतच कोल्हापुरात सूर्यदर्शन होत असले तरीही पूर परिस्थितीचा धोका अद्यापही कायम आहे. राधानगरी धरण 93 टक्क्याहून अधिक भरले असून सद्याची परिस्थिती पाहता पुढील 12 तासात धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

कोल्हापूर : पाऊस उघडला; महापुराचा धोका कायम
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 2000 वाहने अडकली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com