esakal | आराेग्यमंत्री येताच कोल्हापुरात अधिका-यांची झाली धावाधाव
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope

आराेग्यमंत्री येताच कोल्हापुरात अधिका-यांची झाली धावाधाव

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : राज्याचे आरोग्य मंत्री यांची अगोदर उपस्थिती आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अशी धावपळ आज येथे आयोजित बैठकीत झाली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे rajesh tope आज (शुक्रवार) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. ही बैठक नियोजीत नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत. बैठकीपुर्वी मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते .

(rajesh-tope-kolhapur-visit-covid19-update-marathi-news)

पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे उशीरा कार्यालयात आले. त्यामुळे हे तिघेही धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.

जिल्ह्यातील दुकाने सोमवारी सुरु होतील असे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपेनीं दिले आहेत. आज व्यापा-यांनी मंत्री टोपेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात काेविड 19 च्या अनुषंगाने बैठक सुरु आहे.

loading image