esakal | अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार; राजू शेट्टींचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty

अन्यथा दुकानदारांसह रस्त्यावर उतरणार; राजू शेट्टींचा इशारा

sakal_logo
By
पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील दुकानदारांच्या समर्थनार्थ आता माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी शहरातील दुकानदारांच्या प्रतिनिधींची भेट घेवून त्यांना पाठिंबा व्यक्त केला. गुरुवारपर्यंत निर्णय न झाल्यास दुकानदारांसह आपण रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा शेट्टी यांनी आज येथे दिला. (raju-shetti-demand-to-start-all-shops-in-ichalkaranji-kolhapur-news)

केवळ कोल्हापूर शहरात दुकाने सुरु करण्याच्या निर्णयावरही त्यांनी यावेळी जोरदार टिका केला. त्यामुळे इचलकरंजीतील दुकाने सुरु करण्याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या धर्तीवर इचलकरंजीतील सरसकट दुकाने सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप अपेक्षीत यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर माजी खासदार शेट्टी यांनी इचलकरंजीतील दुकानदारांच्या प्रतिनिधींशी भेट घेवून तासभार चर्चा केली. त्यानंतर त्यांनी याप्रश्नी दुकानदारांना पाठिंबा व्यक्त करीत आपली भूमिका जाहीर केली. याबाबत आपण मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेट्टी म्हणाले, कोविड तपासणीचा दर कोल्हापूरातील जास्त आहे. तुलनेने इचलकरंजीचा दर १० टक्केच्या आत आहे. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी केवळ कोल्हापूर शहरातच व्यवहार सुरु करण्यास मंजुरी आणली आहे. इचलकरंजीत व्यवहार सुरळीत होणे आवश्यक असतांना तेथे मात्र व्यवहार बंद आहेत. वास्तविक निर्णय हा जिल्ह्यासाठी घेण्याची गरज होती. पण कोल्हापुरातील व्यापा-यांनी आक्रमक भुमिका घेतली. पण आपल्या मतदार संघासाठी वेगळा न्याय आणि उर्वरीत शहरासाठी वेगळा न्याय असे होत असेल तर दुर्देवी बाब आहे.

हेही वाचा- Photo:पणदेरी धरणाच्या मुख्य भिंतीला मोठी गळती;नागरिकांचे स्थलांतर करण्याचे प्रशासनाचे आदेश

गोकुळच्या निवडणुकीत कोरोना संसर्गाबाबतचा नियम आड आला नाही. इतर सभा, बैठका, मेळावे यांना नियम लागू झाला नाही. मात्र सर्वसामान्य नागरिक अचडणीत आहेत. हातावर पोट असणा-या नागरिकांची संख्या इचलकरंजीत मोठी आहे. पण त्यांचे व्यवहार बंद राहिले आहेत. सातत्यांने प्रशासनाकडून दबावतंत्र वारपले जात आहे. आता हे फार काळ चालणार नाही. दुकाने सुरु करण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा, सर्व दुकानदार रस्त्यावर उतरणार आहे. सकाळी १० वाजता आम्ही सर्वजण चौकात असणार आहे. आम्ही दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाने खुशाल कारवाई करावी, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

loading image