ज्यांच्या प्रेमामुळे खासदार पदापर्यंत पोचलोय, आज तीच माणसं..; शेतकऱ्यांच्या मृत्यूनं राजू शेट्टी हतबल

आंदोलनात खांद्याला खांदा लावून साथ दिली, अशा लोकांचे जाणे त्यांच्या जिव्हारी लागत आहे
ज्यांच्या प्रेमामुळे खासदार पदापर्यंत पोचलोय, आज तीच माणसं..; शेतकऱ्यांच्या मृत्यूनं राजू शेट्टी हतबल

कोल्हापूर : जिवाभावाच्या लोकांचे निधन होत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी (raju shetty) चांगलेच व्यथित झाले आहेत. अनेक वर्षे दिल्लीत खासदार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देश पातळीवरील कृषी क्षेत्रात काम करणारे मोठे नेते जोडले पण त्यांना श्रद्धांजली वहाताना शेट्टी गलबलून गेले आहेत. नेत्यांबरोबर अगदी दररोज हक्काने हाक मारून चौकशी करणारे स्थानिक पातळीवरील शेतकरीही कोरोनामुळे (covid-19) मृत्युमुखी पडत आहेत. ज्या लोकांच्या प्रेमामुळे ते खासदार पदापर्यंत पोचले. ज्यांनी शेट्टी यांच्याशी जिव्हाळा तयार केला. आंदोलनात खांद्याला खांदा लावून साथ दिली. अशा लोकांचे जाणे त्यांच्या जिव्हारी लागत आहे. हा विदारक अनुभव त्यांनी सोशल मीडियावरून (social media) शेअर केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात,

माझ्या जिव्हाळ्याची माणसं एकापाठोपाठ एक घेण्याचा सपाटाच कोरोनाने लावला आहे. गेल्याच आठवड्यात देशाचे माजी कृषीमंत्री चौधरी अजित सिंग (chudhari ajit sing) आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. टी. हक यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट मी लिहिली आणि बाळासाहेब चौगुले (balasaheb chaugale) एका रांगड्या शेतकरी कार्यकर्त्यांवर श्रद्धांजलीची पोस्ट लिहिण्याची वेळ माझ्यावर आली. बाळासाहेब चौगुले हे हेरवाड (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) या गावचे.

ज्यांच्या प्रेमामुळे खासदार पदापर्यंत पोचलोय, आज तीच माणसं..; शेतकऱ्यांच्या मृत्यूनं राजू शेट्टी हतबल
शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी: 'माझा डॉक्टर संकल्पना' कोल्हापूर जिल्ह्यात राबवा

शेतकरी गडी रांगडा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल असंच ती त्यांची बुलेट, दररोज सकाळी साडे पाचला मला त्या बुलेटचं आणि बाळासाहेबांचे दर्शन घडायचं, मी फिरायला बाहेर पडलो कि नेमकं त्याच वेळी बाळासाहेब बुलेट वरून गुलाबाची फुले घेऊन मिरज मार्केटला जायला निघायचे. रस्त्यात मी भेटणार हे माहीत असल्यामुळे हमखास माझ्यासाठी चार-पाच गुलाब एकत्र करून एक गुच्छ तयार करून घेऊन यायचे आणि माझ्या हातात दिल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही.

एखाद्या वेळेस मी बाहेरगावी गेलो असलो तरी न चुकता आमच्या घरी पोहोचत असे. असे हे बाळासाहेब संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेच्या कोणत्याही आंदोलना किंवा मोर्चा असो किंवा अजून काही उपक्रम असो पहिल्या फळीत असायचे. एवढा मोठा धिप्पाड गडी कोरोनाशी झुंज देता देता हरला आणि मी जिवाभावाचा साथीदार गमावला. असे साथीदार गमावणे हे भरून निघणारे नुकसान असल्याचे शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

ज्यांच्या प्रेमामुळे खासदार पदापर्यंत पोचलोय, आज तीच माणसं..; शेतकऱ्यांच्या मृत्यूनं राजू शेट्टी हतबल
संभाव्य महापूर नियंत्रणासाठी इचलकरंजी पालिका सज्ज; 5 हजार कुटूंबांची व्यवस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com