
नांदणी गावातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्याच्या निर्णयाने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गेल्या 33 वर्षांपासून महादेवी, ज्याला स्थानिक प्रेमाने ‘माधुरी’ म्हणतात, ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनली होती. लाखो लोकांच्या मनात तिने विशेष स्थान निर्माण केले होते. मात्र, PETA India ने नांदणी येथील मठात महादेवीवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तिला वनतारा येथे हलवण्याची मागणी केली. यानंतर तिचे स्थलांतर झाले, ज्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.